ताजी बातमी ऑनलाईन टीम
शक्तिमान (Shaktimaan) हा कार्यक्रम पाहिला नाही असा क्वचितच कुणी असेल. शक्तिमान हा एकेकाळी लहान मुलांचा सुपरहिरो… हाच सुपर हिरो आता मोठ्या पडद्यावर अवतरणार आहे. अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांनी याची घोषणा केली आहे. देशातील पहिला टीव्ही सुपरहिरो ‘शक्तिमान’ लवकरच पुनरागमन करणार आहे.
या सुपर हिरोची क्रेझ इतकी आहे की या चित्रपटाची घोषणा होताच ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि मग काय सोशल मीडियावर नुसता धुमाकूळ… सगळीकडे फक्त एक चर्चा शक्तिमान आणि शक्तिमान… आता आपला लाडका शक्तिमान मोठ्या पडद्यावर येणार म्हटल्यावर लोकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही अन् मग सुरु झाला मिम्सचा पाऊस… काहींनी तर या शक्तिमानची तुलना अल्लू अर्जूनच्या सुपरहीट पुष्पाशी केली. शक्तिमानला थेट पुष्पाचा डायलॉग म्हणायला लावला.
आपला सुपहिरो मोठ्या पडद्यावर येणार म्हटल्यावर त्याचे फॅन्समध्येही उत्साह संचारलाय. यावर अनेक हटके मीम्स बनलेत.
एकाने लिहिलंय, “शक्तिमान पडद्यावर आल्यावर मजा येणार…”
Shaktimaan : शक्ति.. शक्ति… शक्तिमान मोठ्या पडद्यावर अवतरणार, फॅन्सचा आनंद गगणात मावेना, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -