Monday, December 23, 2024
Homeकोल्हापूरधक्कादायक: कोल्हापूरातील जयाप्रभा स्टुडिओची विक्री, ज्यांनी आंदोलन केले त्याच नेत्याच्या मुलांचा सहभाग

धक्कादायक: कोल्हापूरातील जयाप्रभा स्टुडिओची विक्री, ज्यांनी आंदोलन केले त्याच नेत्याच्या मुलांचा सहभाग

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापुरातील जया प्रभा स्टुडिओच्या जागेची दोन वर्षापूर्वीच विक्री झाल्याची माहिती आज समोर आली आहे प्रकारामुळे कोल्हापुरातील (Kolhapur) कलाप्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकीच्या या ऐतिहासिक जागेची विक्री (Sale of land) होऊ नये यासाठी कोल्हापूरकर लढा देत होते. मात्र आज ही जागा विकली गेल्याचे माहिती समोह आली आल्यानंतर आता कोल्हापूरात नव्या वादाला तोंड फुटल आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओमध्ये उभा करण्याच्या हालचाली सुरू असतानाच स्टुडिओची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मालकिची कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची जागा दोन वर्षांपूर्वी विक्री केल्याचे उघड झाले आहे. लतादीदींच्या निधनानंतर त्यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओ परिसरात उभा करण्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर ही धक्कादायक माहिती ही समोर आली आहे. 15 फेब्रुवारी 2020 रोजी 6 कोटी 50 लाखाचा व्यवहार या जागेचा झाला आहे.

लता मंगेशकर यांच्याविरोधात मोर्चा
महालक्ष्मी स्टुडिओ एलएलपी या फार्मने ही जागा खरेदी केली आहे. विशेष म्हणजे याच्या भागीदारांमध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या रुतुराज आणि पुष्कराज या दोन्ही मुलांची नाव आहेत. हेरिटेज वास्तूंमध्ये समावेश असलेल्या जयप्रभा स्टुडिओ मूळ स्वरूपात राहावा यासाठी कोल्हापूरकरांनी प्रसंगी लता मंगेशकर यांच्याविरोधात मोर्चा काढला होता. कोल्हापूरकरांनी हातात पायताण घेऊन केलेल्या आंदोलनामुळे लतादीदी कायमच्या कोल्हापूरपासून दुरावल्या होत्या. याच जयाप्रभा स्टुडियओबाबत न्यायालयातही लढाई सुरू असतानाच जयप्रभा स्टुडिओच्या जागेची विक्री झाल्याचे समोर आल्याने कोल्हापुरात संतापाची लाट उसळली आहे.

कोल्हापूरवर दरोडा
जयप्रभा स्टुडिओची विक्री म्हणजे कोल्हापूरवर दरोडा असून हेरिटेजमधील वास्तू विकली गेलीच कशी असा सवाल आता नगरसेवक भूपाल शेटे यांनी उपस्थित केला आहे. याबाबतीत लवकरच जनहित याचिका देखील दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहेत.

जयप्रभा स्टुडिओचा इतिहास
कलेचे माहेरघर असलेल्या कोल्हापुरात चित्रपटनिर्मिती व्हावी यासाठी राजाराम महाराजांनी 1934 मध्ये त्याकाळी शहरापासून बाहेर असलेली 13 एकर जागा भालजी पेंढारकर यांना दिली. भालजी पेंढारकर यांनीही चित्रपट निर्मितीसाठी या जागेचा वापर करत त्या ठिकाणी अनेक यशस्वी चित्रपट केले. मात्र काही काळानंतर भालजी पेंढारकर कर्जबाजारी झाले आणि त्यांनी ही जागा लता मंगेशकर यांना दिली.

लता मंगेशकर यांनीही भालजी पेंढारकर जिवंत असेपर्यंत याचा कला क्षेत्रासाठी वापर केला. त्यानंतर मात्र यातील काही जागेवर मोठ्या इमारती उभे राहू लागल्या. त्यामुळे जयप्रभा स्टुडिओचा असलेली शहर परिसरातील जागाही धोक्यात आली.

कोल्हापूरात पायताण आंदोलन
जयप्रभा स्टुडिओ हेरिटेज म्हणून जतन करावा यासाठी कोल्हापुरात मोठा लढा उभा राहिला होता. त्यावेळी कोल्हापूरकरांनी लतादीदींविरोधात पायताण आंदोलन पुकारले होते. जयप्रभा स्टुडिओ वाचवा म्हणून आंदोलन आणि न्यायालयीन लढा दिला गेला होता, हे सगळं सुरु असतानाच मात्र ही जागा विकली गेल्याचे समोर आल्यानं कोल्हापूरकरांमधून आता संताप व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -