Saturday, February 21, 2026
Homeमहाराष्ट्रकरन्सी नोट प्रेस च्या आवारात भीषण आग

करन्सी नोट प्रेस च्या आवारात भीषण आग

भारतातील अतिसंवेदनशील मानल्या जाणाऱ्या नाशिकमधील नाशिकरोड येथील करन्सी नोट प्रेस ला आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान अचानक आग लागली. ही आग करन्सी नोट प्रेस च्या आवारात लागल्याने सुदैवाने मोठी वित्तहानी टळली. आग लागून दोन तास उलटून गेल्यानंतर ही आग आटोक्यात येत नाही आहे. अग्निशामक दलाच्या जवानांचे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

नोट प्रेसच्या आवारात असलेला कच्चा माल तसेच कचरा आगीत भस्मसात झाला आहे. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधी यांना प्रेसच्या आवारात जाण्यास परवानगी नसल्यामुळे नेमका काय प्रकार झाला याविषयी स्पष्ट माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. आगीत वित्तहानी तसेच मालमत्तेचे किती नुकसान झाले. याविषयी प्रशासनाने अधिकृत माहिती दिलेली नाही. दरम्यान आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -