ताजी बातमी ऑनलाईन टीम
अष्टपैलू पॅट कमिन्सचे (नाबाद 56) पुण्यात वादळ घोंगावले. त्याने अवघ्या 14 चेंडूत आयपीएलमधील दुसर्या वेगवान अर्धशतकाची नोंद करत केकेआरला (KKR vs MI) मुंबई इंडियन्सवर अद्याप 24 चेंडून बाकी असताना 5 विकेटने विजय मिळवून दिला. सलामीवीर वेंकटेश अय्यरनही नाबाद अर्धशतक झळकावून संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. मुंबईला मात्र सलग तिसर्या पराभवाला सामोरे जावे लागले. सूर्यकुमार यादवची (52) खेळी मात्र व्यर्थ ठरली.
विजयासाठी 162 धावांचे टार्गेट असताना केकेआरने 16 षटकांत 5 विकेटस् गमावून 162 धावा काढत विजय मिळविला. वेंकटेश अयर व अजिंक्य रहाणे यांनी केकआरच्या डावास संथ सुरुवात करताना 16 धावांची सलामी दिली. मात्र टायमल मिल्सने केकेआरला पहिला धक्का देताना रहाणेला (7) झेलबाद केले. त्यानंतर वेंकटेश अय्यर व श्रेयस अय्यर जोडी केकेआरला सावरणार असे वाटत असतानाच सॅम्सला चौकार खेचण्याच्या प्रयत्नात कर्णधार श्रेयसने (10) तिलक वर्माकडे झेल दिला.
केकेआर 2 बाद 35 वेंकटेश अयर व सॅम बिलिंग्ज यांनी आठव्या षटकात केकेआरचे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, बिलिंग्जला 17 धावांवर एम. अश्विनने झेलबाद करत मोठा अडसर दूर केला. भरवशाचा फलंदाज नितीश राणाही अवघ्या 8 धावांवर परतला. तर धोकादायक रसेल (11) बाद झाला. (





