Xiaomi ने भारतीय बाजारात आपला मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Xiaomi 12 Pro लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 120Hz E5 AMOLED डिस्प्ले, ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आणि स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर यांसारख्या अनेक खास फीचर्संनी सुसज्ज आहे. यामध्ये वापरकर्त्यांना फास्ट चार्जिंग सपोर्टसह मजबूत बॅटरी क्षमता मिळेल. भारतात Xiaomi 12 Pro ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल तपशीलवार माहिती जाणून घेऊया.
कीमत आणि उपलब्धता
Xiaomi 12 Pro च्या किंमतीचा विचार केला तर त्याच्या बेस मॉडेलची किंमत 62,999 रुपये आहे आणि यात 8GB रॅम देण्यात आली आहे. तर 12 जीबी रॅम मॉडेल 66,999 रुपये किमतीत बाजारात लॉन्च केले गेले आहे. स्मार्टफोनची विक्री 2 मे रोजी दुपारी 12 वाजता सुरू होईल. हा स्मार्टफोन Amazon, Mi.com, Mi Home stores आणि रिटेल स्टोअर्समधून खरेदी केले जाऊ शकतो.
ऑफर्स
Xiaomi 12 Pro स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या ऑफरबद्दल बोलायचे झाल्यास, वापरकर्त्यांना इन्ट्रोड्यूसरी ऑफर म्हणून 4,000 रुपयांची सूट मिळेल. तसेच तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे कार्ड खरेदी करण्यासाठी वापरल्यास तुम्हाला 6,000 रुपयांची सूट मिळेल. हा स्मार्टफोन Couture Blue, Noir Black आणि Opera Mauve कलर व्हेरियंटमध्ये उपलब्ध असेल.
स्पेसिफिकेशन्स
Xiaomi 12 Pro स्मार्टफोन Android 12 OS वर आधारित आहे आणि octa-core Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे. यात 1,440×3,200 पिक्सेलच्या स्क्रीन रिझोल्यूशनसह 6.72-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यावर कॉर्निंग गोरिल्ला कोटेड आहे. पॉवर बॅकअपसाठी या स्मार्टफोनमध्ये 120W Xiaomi Hypercharge फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,600mAh Li-Polymer बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन क्विक चार्ज 4 आणि क्विक चार्ज 3+ ला सपोर्ट करतो.
फोटोग्राफी यूजर्संसाठी काय?
फोटोग्राफीसाठी यूजर्सना यामध्ये तीन रियर कॅमेरे मिळतील. त्याचा प्रयमरी सेन्सर 50MP आहे, तर त्यात 50MP अल्ट्रा वाइड शूटर आणि 50MP टेलिफोटो सेन्सर आहे. तसेच जर तुम्ही सेल्फीचे शौकीन असेल तर तुम्हाला यात 32MP फ्रंट कॅमेरा मिळेल. कॅमेरा फीचर्स म्हणून यात Xiaomi ProFocus, Portrait Night Mode, Portrait HDR आणि Photo Clones इत्यादी फीचर्स देण्यात आले आहे.