Friday, November 28, 2025
Homeमनोरंजननॅशनल क्रश रश्मिका पुन्हा चर्चेत, पाहा तिने काय केलंय

नॅशनल क्रश रश्मिका पुन्हा चर्चेत, पाहा तिने काय केलंय

ताजी बातमी ऑनलाईन टीम

नॅशनल क्रश रश्मिका मंदाना (rashmika mandanna) ही दक्षिणेकडील फिल्म इंडस्ट्रीची सुपरस्टार आहे. तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ‘पुष्पा’ सिनेमानंतर तिची लोकप्रियता अधिक वाढली आहे. ती केवळ अभिनयासाठीच नाही तर तिच्या आउटफिट्ससाठीही प्रसिद्ध आहे. रश्मिका मंदान्नाचा प्रत्येक पोशाख अतिशय अप्रतिम असतात. विशेषत: तिचे एथनिक पोशाख खूपच आकर्षक आहेत. जर तुम्ही लग्न किंवा पार्टीला जाण्यासाठी एथनिक आउटफिट घालण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही यासाठी रश्मिका मंदाना हिच्याकडून प्रेरणा घेऊ शकता. रश्मिकाच्या ड्रेसचीच जास्त चर्चा असते.



साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून हॉलिवूड आपला ठसा उमटवणारी रश्मिका (rashmika mandanna) सध्या खूप चर्चेत आहे. तिच्या ‘पुष्पा’ चित्रपटाने अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. रश्मिकाला दररोज मुंबईत पाहिले जात आहे. तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण नॅशनल क्रशला एका मुलाखतीत एका ओप्स मोमेंटला बळी पडावे लागले. याचीही जोरदार चर्चा सुरु आहे.



ग्रीन लेहेंगा – जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीच्या लग्नाला जात असाल तर रश्मिका मंदान्नाचा हा एथनिक वेअर लूक पुन्हा पुन्हा पाहत राहाल. या फोटोमध्ये रश्मिकाने हिरव्या रंगाचा लेहेंगा घातला आहे. या हिरव्या रंगाच्या सिक्विन लेहेंग्यात तुम्ही खूप सुंदर दिसाल. हिरव्या मोत्याचे झुमके, साधा मेकअप आणि सैल केसांसह रश्मिका सारख्या लेहेंगासह तुमचा लूक हटके आणि वेगळा दिसून येईल.



लाइट गोल्डन साडी – प्रत्येक स्त्री साडीत सुंदर दिसते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला साडी कशी व्यवस्थित परिधान करायची हे माहित असेल तर तुम्ही कोणत्याही पार्टीमध्ये ती रॉक करु शकता. तुमच्या मित्राच्या मेहंदी समारंभात तुम्ही लाइट गोल्डन कलरची साडी घालू शकता. सोनेरी रंगाच्या साडीसह पांढरा व्ही डीप नेक ब्लाउज घाला. लूक परफेक्ट बनवण्यासाठी तुम्ही

रश्मिकासारखे मॅचिंग ज्वेलरी कॅरी करु शकता.
अनाकरली सूट- अनारकली सूट दिसायला खूप सुंदर दिसतो. त्यामुळे तुम्ही ते सहज परिधान करु शकता. जर तुम्ही हलके एम्ब्रॉयडरी असलेला सूट घातला असेल तर त्यासोबत चोकर ज्वलरी घालावी. हेअरस्टाईलमध्ये तुम्ही सुट्टे केस ठेवू शकता किंवा समोरचे केसांना ट्विस्ट करा किंवा पफ लूक देऊन मागच्या बाजूला पिनने सेट करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -