मुंबईतील बोरिवली न्यायालयाने खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या सुटकेचा आदेश जारी केला आहे. यामुळे तब्बल १३ दिवस न्यारयालयीन कोठडीत असणार्याा राणा दाम्पयत्याजला मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचा आग्रह धरणे. त्याचबरोबर चिथावणीखोर वक्तव्य, धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण केल्याबद्दल अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना २३ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती.
राणा दाम्पत्याच्याप जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयात काल बुधवारी सुनावणी झाली होती. न्यायालयाने राणा दाम्पआत्यााला जामीन मंजूर केला आहे. राणा दाम्पत्याला प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटीशर्थींसह जामीन मंजूर केला आहे. त्यांची सुटका करण्याची कायदेशीर प्रक्रिया न्यायालयात पूर्ण झाली आहे. यामुळे त्यांच्या सुटकेचा आदेश न्यायालयाने जारी केला आहे.
पत्रकारांशी संवाद साधू नये, पोलिस तपासात अडथळे निर्माण होतील असे कोणतेही कृत्यु करु नये, साक्षीदारांना प्रलोभन दाखवणे अथवा त्यांाच्यातवर दबाव आणू नये, पुन्हाु अशा गुन्या ानत सहभागी घेवू नये, अशा अटी घालत विशेष न्याायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्पवत्या ला प्रत्येहकी ५० हजारु रुपयांची वैयक्ति क हमी तसेच तेवढ्याचर रकमेचे दोन हमीदार देण्यादच्यान अटींवर जामीन मंजूर केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने २५ एप्रिल रोजी झालेल्या सुनावणीवेळी, राणा दाम्पत्याची चांगलीच कानउघडणी केली होती. गुन्हा रद्द करण्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावला होता. विशेष सरकारी वकिलांच्या दाव्यात तथ्य असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.
तुरुंगातून सुटण्याआधी राणा दाम्पत्याच्या खार येथील घरी मुंबई महानगरपालिकेचं पथक दाखल झाले आहे. त्यांच्या घरी अवैध बांधकाम झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.