हरवलेल्या एटीएम कार्डद्वारे भामट्याने एक लाखाची रक्कहम काढून घेतली. तशी फिर्याद निवृत्त जवान समरजित सिंग (वय 57, रा. विजयनगर) यांनी कॅम्प पोलिसांत दिली आहे. विशेष म्हणजे एकाचवेळी व एका दिवसांत 1 लाख खात्यावरून काढता येत नसल्याने भामट्याने 70 हजारांचे सोने खरेदी केले, तर 30 हजारांची रोकड काढली
याबाबत मिळालेली माहिती अशी की, समरजित सिंग यांचे एटीएम कार्ड हरवले होते. ते कसे व कुठे पडले याची त्यांनादेखील कल्पना नव्हती. परंतु, 5 मे रोजी त्यांच्या खात्यातील 70 हजार रु. डेबिट झाल्याचा संदेश त्यांना आला.
या संदेशात खडेबाजारमधील मलबार गोल्डमधून 70 हजारांचे सोने खरेदी केल्याचा उल्लेखदेखील होता. यावेळी सिंग पुण्यात होते. हा संदेश पाहून धक्काह बसलेल्या सिंग यांनी तातडीने आपल्या ओळखीच्या व्यक्ती्ला मलबार गोल्डमध्ये पाठवले. परंतु, तोपर्यंत भामट्याने 70 हजारांची खरेदी करून पोबारा केला होता. यानंतर भामट्याने आयडीबीआय बँकेत जाऊन तीनवेळा प्रत्येकी 10 हजार अशी रक्क म काढून घेतली. तेथेही जाऊन पाहिले असता भामटा निघून गेला होता.
पिन क्रमांक कसा मिळाला?
भले एटीएम हरवले तरी भामट्याने त्याचा पिन क्रमांक कसा क्रॅक केला? असा प्रश्न पोलिसांना देखील पडला आहे. आपले एटीएम हरवले आहे, याची कल्पना सिंग यांनाही नव्हती. त्यामुळे त्यांनी अकाऊंट ब्लॉक करण्याची विनंती देखील बँकेला केली नव्हती. जेव्हा सोने खरेदी झाली, तेव्हाच त्यांनी एटीएम तपासून पाहिले असता त्यांच्याकडे नव्हते.
एटीएमधारकांनो सावधान..!
जर चुकून एटीएम हरवले तर पिन क्रमांक आपल्याकडे आहे, असे समजून एटीएमधारकांनी ही बाब सहज घेऊ नये. एटीएम हरवले तर तातडीने बँकेला अकाऊंट ब्लॉकची माहिती द्या. आता भामटे एटीएमचा पिन क्रमांकही क्रॅक करू लागल्याने हे धोक्याचे ठरत आहे.