Monday, July 28, 2025
Homeक्रीडा'केकेआर'चा कर्णधार श्रेयस अय्‍यर नको 'ते' बोलला..! अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या

‘केकेआर’चा कर्णधार श्रेयस अय्‍यर नको ‘ते’ बोलला..! अनेकांच्‍या भुवया उंचावल्‍या

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आयपीएल स्‍पर्धेत सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स ( केकेआर) आणि मुंबई इंडियन्‍स आमने-सामने होते. नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्‍टेडियमवर रंगलेल्‍या या सामन्‍यात केकेआरने ५२ धावांनी मोठा विजय नोंदवला. या सामन्‍यात केकेआरने संघातील पाच खेळाडूंना बदलले होते. सामन्‍यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्‍यर (Shreyas Iyer Reveals ) हा नको ते बोलला आणि सारेच अवाक झाले.

Shreyas Iyer Reveals : श्रेयस नेमकं काय बोलला?
संघात कोण असणार याचा अंतिम निर्णय हा कर्णधार आणि प्रशिक्षकच घेत असतात. मात्र केकेआरमध्‍ये असं झालं नाही. यासंदर्भात बोलताना श्रेयस म्‍हणाला, ” मैदानात कोणता खेळाडू उतरणार या निर्णयात संघाचे सीईओ वेंकी मैसूर यांचा हस्‍तक्षेप होता. आजही संघात कोण खेळणार यावर एक बैठक झाली. यावेळी प्रशिक्षकांबरोबरच टीमचे सीईओ वेंकी मैसूर हेही उपस्‍थित होते. त्‍यानुसार कोणता खेळाडू संघात राहणार आणि कोण बाहेर जाणार हे त्‍याचचेळी ठरलं. ज्‍यांना संघात स्‍थान मिळाले नाही, त्‍यांना प्रशिक्षक ब्रेंडन मॅकलम यांनी सूचना दिली. या निर्णयावर सर्व खेळाडूंनीही संमती दिली, असे श्रेयसने सामना झाल्‍यानंतर सांगितले.

संघ निवडीत थेट सीईओंचा हस्‍तक्षेप?
संघ निवडीत थेट संघाच्‍या सीईओ हस्‍तक्षेप असल्‍याचा कर्णधार श्रेयसने कबुली दिल्‍याने केकेआर गोटात एकच खळबळ उडाली आहे. तसेच उपस्‍थितांचाही भुवया उंचावल्‍या. कारण संघ निवडीचा अधिकार हा केवळ कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्‍याकडे असतो. त्‍यामुळेच संघ पराभूत झाल्‍यास त्‍यांच्‍याकडेच विचारणा होते. त्‍यामुळेच केकेआरचे सीईओ वेंकी मैसूर यांना क्रिकेट खेळण्‍याचा अनुभव नाही; मग संघ निवडीत त्‍यांनी हस्‍तक्षेप केल्‍याच कसा ? असा सवालही उपस्‍थित केला जात आहे. संघ निवडीत सीईओंचा हस्‍तक्षेत असल्‍याचा खुलासा केल्‍याने श्रेयस अय्‍यर केकेआरच्‍या व्‍यवस्‍थापन मंडळात एकच खळबळ उडाली आहे. संघ व्‍यवस्‍थापनावरही काही नवे प्रश्‍नही उपस्‍थित झाले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -