ताजी बातमी ऑनलाईन टीम
पिंपरी चिंचवडः कुठेही कोरोनाची (Corona) चौथी लाट असल्याचा माझा सूतोवाच नाही, मात्र सध्या छोटी संख्या वाढत आहे. महराष्ट्राने मोठी संख्या पहिली असून, मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे याठिकाणी थोडी रुग्ण संख्या वाढली असल्याचे दिसत आहे. ज्या राज्यात रुग्ण संख्या वाढत आहे, त्याठिकाणच्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक झाली आहे. त्यामध्ये रुग्ण गंभीर नाहीत व रुग्ण संख्या वाढली तरी सौम्य लक्षणे असतील असा अनुमान काढण्यात आले असल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
यावेळी आरोग्य विभागाच्या परीक्षेविषयी (Health Department Exam) बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही ड वर्गाची पुन्हा परीक्षा घेणार असून चौकशीचा अंतिम अहवाल आल्यानंतर याविषयीचा निर्णय सांगितले जाईल असेही त्यांनी सांगितले.
पोलिसांकडून सखोल चौकशी आरोग्य विभागाच्या भरती संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी आश्वासन दिले आहे. त्याप्रकरणी पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यासंदर्भात आदेश देण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणाचा अंतिम अहवाल काय येणार आहे ते महत्वाचे आहे. तसेच ड वर्गाचा पेपर पूर्ण व्हायरल झाला होता त्यामुळे आम्ही पुन्हा ‘ड’ वर्गाची परीक्षा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या ‘ड’ वर्गाची परीक्षा आम्ही पुन्हा घेणार; कोरोनाविषयीही राजेश टोपेंचं गंभीर विधान
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -