नागपूर शहरातील हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या हद्दीत सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेने ही धडक कारवाई केली आहे. धक्कादायक म्हणजे एक सेवानिवृत्त अर्थात पेन्शनर महिला हे रॅकेट चालवत होती, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.
रेखा उर्फ अनिता पाचपोर असे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेचे नाव असून तिला ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईनंतर पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली आहे. आरोपी महिला पतीची सेवानिवृत्त वेतन अर्थात पेन्शन घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे नरसाळा मार्गावरील संत ज्ञानेश्वर नगरातील एका घरात छापेमारी करून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. प्रमुख सूत्रधार रेखा पाचमोर हिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा शाखेच्या पथकाला यासंदर्भात गोपनिय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. बनावट ग्राहक नरसाळा मार्गावरील संत ज्ञानेश्वर नगरात पाठवला. त्यानंतर पोलिसांना मिळालेली माहिती सत्य असल्याचे समजताच पोलिसांनी घरावर छापा टाकला. सूत्रधार रेखा पाचमोर हिला रंगेहाथ ताब्यात घेतले तर दोन पीडित महिलांची सूटका करण्यात आले. दरम्यान महिला आरोपीला या पूर्वी देखील याच गुन्ह्यात अटक झाली होती.
आरोपी रेखा पाचमोर हिचा गेल्या अनेक महिन्यांपासून गोरखधंदा सुरू होता. ती गरजू आणि गरीब तरुणी-महिलांना तिच्या जाळ्यात ओढायची. त्यांच्याकडून देहविक्री करून घ्यायची. ग्राहकांकडून मिळणाऱ्या रकमेतून निम्मी रक्कम स्वत: कडे ठेवायची आणि निम्मी रक्कम पीडित महिलांना देत होती, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.





