ताजी बातमी ऑनलाईन टीम
प्रसिद्ध गायक केके (Singer KK) यांचं निधन झालं आहे. कोलकात्यात एका लाईव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असताना केकेची प्रकृती अचानक खालावली. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु रुग्णालयातून त्यांच्या मृत्यूची (Singer KK Died) बातमी आली आहे. केके हे बॉलीवूडमधलं एक प्रसिद्ध नाव होतं. केकेचं पूर्ण नाव कृष्णकुमार कुननाथ (Krishnakumar Kunnath) होतं. परंतु केके याच नावाने तो प्रसिद्ध झाला.
केकेनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. तो तरुणांमध्ये खूप प्रसिद्ध होता. मृत्यूच्या काही काळ आधी तो एका कॉन्सर्टमध्ये लाईव्ह फरफॉर्म करत होता. परंतु या कार्यक्रमातच त्याला हृदयविकारा झटका आला आणि त्याचे निधन (Famous Singer KK Has Passed Away) झाले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. तो 53 वर्षांचा होता. 2000 च्या दशकाच्या सुरुवातीपासून केकेने पार्श्वगायनात आपले करियर सुरू केले होते. बॉलीवूड व्यतिरिक्त तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम, मराठी आणि बंगालीसह अनेक भाषांमध्ये त्याने गाणी रेकॉर्ड केली.
Singer KK Dies: प्रसिद्ध गायक केके काळाच्या पडद्याआड, लाईव्ह कॉन्सर्टमध्ये आला हार्ट अटॅक
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -