Sunday, July 6, 2025
Homeब्रेकिंगस्विगी-झोमॅटोला दर्जात्मक पदार्थ पुरवावे लागणार

स्विगी-झोमॅटोला दर्जात्मक पदार्थ पुरवावे लागणार

ऑनलाईन खाद्यपदार्थांची ऑर्डर ग्राहकांना सुपुर्द करणारया स्विगी व झोमॅटो या कंपन्यांना आता यापुढे दर्जात्मक खाद्यपदार्थांचा पुरवठा करावा लागणार आहे. येत्या 1 जुलैपासून याबाबतची नियमावली दोन्ही कंपन्यांना सक्तीने पाळावी लागणार आहे.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि प्रमाणिकरण प्राधिकरण (एफएसएसएआय) यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. प्राधिकरणाने दोन्ही कंपन्यांना वरीलप्रमाणे 1 जुलैपासून केवळ दर्जात्मक खाद्य पदार्थांचीच डिलिव्हरी करण्याचे निर्देश दिले आहेत. ग्राहकांचे हित लक्षात घेऊन प्राधिकरणाने हा निर्णय घेतला असून कंपन्यांनी नियमावलीचे पालन तंतोतंत करणे गरजेचे असल्याचेही प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

हे करावे लागणार
स्विगी व झोमॅटो कंपनीच्या पुरवठाकर्त्यांनी ज्या हॉटेलमधून खाद्यपदार्थांची मागणी नेंदविली आहे, तेथे खाद्यपदार्थांवर पोषक घटकासंबंधीची माहिती आहे, हे आवर्जून पाहायचे आहे. अशा पद्धतीने कंपन्यांना ही खबरदारी घ्यावी लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -