Homeब्रेकिंगएकनाथ शिंदे गुवाहाटीत पहिल्यांदाच मीडियासमोर, संपर्कातील आमदारांची नावे सांगा, ठाकरेंना दिले आव्हान

एकनाथ शिंदे गुवाहाटीत पहिल्यांदाच मीडियासमोर, संपर्कातील आमदारांची नावे सांगा, ठाकरेंना दिले आव्हान

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ५० आमदारांचा गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलात ८ दिवसांपासून मुक्कामाला आहेत. शिंदे यांनी आज (दि.२८) रॅडिसन हॉटेलबाहेर येत पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर येत आपल्या गटाची भूमिका स्पष्ट केली. गुवाहाटीतील आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा त्यांनी खोडून काढत शिवसेनेने त्या आमदारांची नावे सांगावीत, असे थेट आव्हान त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, लवकरच आम्ही मुंबईत परतणार आहे. आम्ही शिवसेनेतच आहोत. शिंदे गटाची भूमिका आमच्या गटाचे अधिकृत प्रवक्ते दीपक केसरकर मांडत आहेत. आम्ही शिवसेनेला पुढे घेऊन निघालो आहोत. शिवसेनेचे ५० लोक स्वत:च्या मर्जीने आले आहेत. ते सर्वजण आनंदी आहेत. बाळासाहेबांची हिंदुत्वाची भूमिका घेऊन ते आले आहेत. ते काही स्वार्थासाठी आलेले नाहीत.

दरम्यान, शिवेसेनेचे बंडखोर आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आज (दि.२८) लाईव्ह संवाद साधताना शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांच्या विखारी टीकेवर बोट ठेवले. आम्हाला गद्दार म्हणण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असे सांगून गुवाहाटीतील कोणताही आमदार शिवसेनेच्या संपर्कात नाही, असा दावा केसरकर यांनी यावेळी केला. लवकरात लवकर महाराष्ट्रात परतणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -