ताजी बातमी ऑनलाईन टीम
जोतिबा डोंगर ; दख्खनचा राजा श्री जोतिबा डोंगरावरील आदिमाया श्री चोपडाई देवीच्या श्रावण षष्ठी यात्रेचा आज (दि. 3) पहिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर श्रावण षष्ठी यात्रा भाविकांच्या उपस्थितीत होणार आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झाले आहे. यात्रेची जय्यत तयारी प्रशासनाने केली आहे.
श्रावण षष्ठी यात्रेसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग कार्यरत आहे. पाणी निर्जंतुकीकरण, अत्यावश्यक सेवा व उपचार याची तयारी केली आहे. महावितरणकडून विद्युतवाहिन्या व प्रकाशदिवे यांची चाचणी केली आहे. भाविकांसाठी दर्शन रांगेची आखणी केली आहे. बुधवारी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुले असणार आहे. गुरुवारी सकाळी श्रावण षष्ठीचा मुख्य आरती सोहळा होणार आहे. देवस्थान समितीकडून ठिकठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. शाहूवाडी प्रांताधिकारी अमित माळी, तहसीलदार रमेश शेंडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती सचिव शिवराज नायकवडी, कोडोली पोलिस ठाण्याचे निरीक्षक शीतलकुमार डोईजड, देवस्थान इन्चार्ज दीपक म्हेतर, सरपंच राधा बुणे यांनी दर्शन रांगेची पाहणी केली.
जोतिबावरील श्रावण षष्ठी यात्रेची जय्यत तयारी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -




