जळगाव शहर पुन्हा सेक्स स्कँडलने (Jalgaon Sex Scandal) चर्चेत आले आहे. शहरात असलेल्या दोन हॉटेल्सवर पोलिसांनी धडा टाकत 13 जोडपी ताब्यात घेतली आहे. या प्रकारामुळे जळगावात (Jalgaon Crime) खळबळ उडाली असून पोलिसांनी हॉटेल मालक आणि दलालाही ताब्यात घेतले आहे. दरम्यान, शहरातील हॉटेल्समध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये (Jalgaon Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील दोन हॉटेल्सच्या लॉजिंगवर वेश्याव्यवसाय सुरु असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांनी तात्काळ दोन पथक तयार केले. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून गुरुवारी एकाच वेळी संबंधित हॉटेल्सवर छापा टाकला. या एका हॉटेलमध्ये तीन-तीन तरुणी आणि तरुण तर दुसऱ्या हॉटेलमध्ये 9 तरुणी आणि 9 तरुण अनैतिक कृत्य करताना आढळून आले. धक्कादायक म्हणजे या तरुणींमध्ये शहरातील वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींचा देखील समावेश आहे. काही तरुणी या परप्रांतीय आहेत. या परप्रांतीय तरुणी सध्या जळगावात स्थायिक झालेल्या आहेत.
दलालमार्फत सुरू होता हा प्रकार
पोलिसांनी कारवाई करत चौकशी केली असता एका हॉटेलवर दलालाच्या माध्यमातून मुली पुरविण्यात आल्याचे उघड झाले आहे. मात्र ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींनी आपण आपल्या मर्जीने आल्याचे सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन हॉटेल मालकासह दलाल आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरात झालेल्या या कारवाईमुळे एकाच खळबळ उडाली आहे. तसेच अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईचे सर्वसामान्य नागरिकांकडून स्वागत होत असून कारवाईत सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.