Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रगणेशभक्तांना खास गिफ्ट! गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून कोकणात जाण्यासाठी 2310 अतिरिक्त बसेस

गणेशभक्तांना खास गिफ्ट! गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाकडून कोकणात जाण्यासाठी 2310 अतिरिक्त बसेस

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोरोना महामारीचे गांभीर्य लक्षात घेत गेल्या दोन वर्षांपासून गणेशोत्सवादरम्यान अनेक निर्बंध लावण्यात आले होते. मात्र आता कोरोनाचे सावट दूर झाल्याने यंदा निर्बंधाशिवाय गणेशोत्सव साजरा होणार आहे. कोकणातील गणेशोत्सवाचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई आण परिसरातील अनेक कोकणवासिय गावी जाणार आहेत. त्यानुसार कोकणातील गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळातर्फे 2,310 जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.



सर्वत्र गणेशोत्सवाची जोरात तयारी सुरू आहे. यंदा 31 ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचे आगमन होत आहे. एसटी महामंडळाने देखील गणेशोत्सवासाठी तयारी केली आहे. उत्सवाच्या दरम्यान 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2022 या कालावधीत जादा बसेस चालवण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे. त्यानुसार ग्रुप आरक्षणासाठी मुंबई, ठाणे, पालघर या विभागातून 1268 बसेस असणार आहेत. तर, वैयक्तिक आरक्षण करणाऱ्यांसाठी 872 बसेस असणार आहेत. ग्रुप आरक्षणासाठी मुंबई विभागातून 667, पालघर विभागातून 313 आणि ठाणे विभागातून 288 बसेस असणार आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -