ताजी बातमी ऑनलाईन टीम
मुंबई: राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. शिवसेना (shivsena) कुणाची? धनुष्यबाण हे चिन्हं कुणाचं? अपात्र आमदारांचं काय होणार? आणि शिंदे-फडणवीस सरकारचं काय होणार? हे उद्याच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. तसेच कोर्टाचा निकाल हा केवळ निकाल राहणार नसून देशासाठी लँडमार्क ठरणार आहे.
त्यामुळे या निकालाकडे केवळ महाराष्ट्राचंच (maharashtra) नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालाची आम्ही वाट पाहत आहोत, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सकाळी स्पष्ट केलं होतं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीही उद्या होणाऱ्या निकालावर भाष्य केलं आहे. उद्या कोर्टात जे व्हायचं ते होईल. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. माझ्यासोबत जनतेच्या भावना जोडल्या आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
Uddhav Thackeray: शिवसेना कुणाची? राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या निकाल; उद्धव ठाकरे म्हणतात, जे व्हायचे ते होईल
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -





