Saturday, February 21, 2026
Homeतंत्रज्ञान‘इंटरनेट डेटा’चे टेन्शन विसरा, ‘या’ कंपनीकडून जबरदस्त रिचार्ज प्लॅन सादर..!!

‘इंटरनेट डेटा’चे टेन्शन विसरा, ‘या’ कंपनीकडून जबरदस्त रिचार्ज प्लॅन सादर..!!

मोबाईल युजर्ससाठी महत्वाची बातमी आहे. ‘वर्क फ्रॉम होम’ करणारे, तसेच ऑनलाईन कॉन्टेन्ट पाहताना अनेकदा इंटरनेट डेटा लवकर संपतो व रंगाचा बेरंग होतो. ही अडचण लक्षात घेऊन भारत संचार निगम लिमिटेड, अर्थात ‘बीएसएनएल’ने (BSNL) आपल्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त प्रीपेड प्लॅन सादर केला आहे..

‘बीएसएनएल’च्या या नवीन प्लॅनमध्ये ग्राहकांना रोज तब्बल 5 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. ‘बीएसएनएल’चा हा प्लॅन ‘एअरटेल’ (Airtel) आणि ‘वोडाफोन-आयडिया’ (Vodafone-Idia) कंपन्यांपेक्षा स्वस्तात उपलब्ध आहे.. त्यामुळे इतर कंपन्यांना ‘बीएसएनएल’चा हा प्लॅन म्हणजे मोठा धक्का असणार आहे. या प्लॅनबाबत सविस्तर जाणून घेऊ या…

‘बीएसएनएल’च्या प्लॅनबाबत…

‘बीएसएनएल’चा हा नवा प्लॅन ग्राहकांना फक्त 599 रुपयांत उपलब्ध होणार आहे. त्यात ग्राहकांना काय सुविधा मिळतील, याबाबत जाणून घेऊ या..

‘बीएसएनएल’च्या या प्लॅनची वैधता 84 दिवसांची असेल.
सर्व वापरकर्त्यांना या प्लॅनमध्ये रोज 100 एसएमएस व मोफत अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.
युजर्सना रोज 5 GB डेटा मिळणार आहे.
विशेष म्हणजे, रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत वापरकर्त्यांना ‘अनलिमिटेड मोफत डेटा’ वापरता येणार आहे.
शिवाय ग्राहकांना झिंग (zing) अॅप व फ्री कॉलरट्यून, अशा सुविधाही मिळणार आहेत.

‘बीएसएनएल’च्या या प्लॅनची तुलना इतर कंपन्यांच्या प्लॅनसोबत केल्यास, सध्या बाजारात याच किमतीत ‘एअरटेल’ व ‘व्ही’चे 599 रुपयांचे प्लॅन उपलब्ध आहेत. मात्र, ‘व्ही’च्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 70 दिवसांच्या वैधतेसह रोज केवळ 1.5 GB डेटा, तर ‘एअरटेल’च्या प्लॅनमध्ये केवळ 28 दिवसांच्या वैधतेसह रोज 3 GB डेटा मिळतो.. शिवाय, रात्रीच्या मोफत अनलिमिटेड डेटाबाबत काहीच तरतूद नाही. त्यामुळे इतर कंपन्याच्या तुलनेत ‘बीएसएनएल’चा प्लॅन्स अधिक फायदेशीर ठरू शकतो..

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -