Friday, January 23, 2026
Homeक्रीडाYuzvendra Chahal ला मागे टाकत Bhuvneshwar Kumar ठरला सर्वात यशस्वी T20 गोलंदाज!

Yuzvendra Chahal ला मागे टाकत Bhuvneshwar Kumar ठरला सर्वात यशस्वी T20 गोलंदाज!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

सचिन तेंडुलकरला प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पहिल्यांदा शून्यावर बाद करणारा टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने
क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये क्लीन करणारा आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रत्येकी पाच- पाच विकेट घेण्याचा विक्रम केला आहे. नुकताच आशिया चषक स्पर्धेत अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या चार ओव्हरमध्ये पाच विकेट घेतल्या आणि टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

अफगाणिस्तानविरुद्धच्या या विक्रमी कामगिरीनंतर भुवनेश्वर कुमारने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 84 विकेट्स घेतले आहेत. त्याने युझवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) मागे टाकून टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा आणि एकापेक्षा जास्त वेळा पाच विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. वयाच्या 22 व्या वर्षी भारताच्या T20 संघात निवड झालेल्या उत्तर प्रदेशच्या अष्टपैलू खेळाडूने टीम इंडियामध्ये पोहोचवल्याबद्दल आपल्या आई-वडिलांचे आणि बहिणीचे आभार मानले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -