Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरKolhapur : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचे ५ गुन्हे उघडकीस ;स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची...

Kolhapur : घरफोडी करणाऱ्या चोरट्यांचे ५ गुन्हे उघडकीस ;स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई

सध्या कोल्हापूर शहरामध्ये मालाविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असून या गुन्ह्यांचा तपास करणे हे पोलिसांसमोर आव्हान बनले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहा. पोलिस निरीक्षक किरण भोसले, पोलिस अंमलदार श्रीकांत मोहिते, रामचंद्र कोळी, अनमोल पवार, वैभव पाटील व विनोद कांबळे यांचे पथक सदर गुन्ह्यांच्या तपासासाठी नेमले गेले होते.

गुन्ह्यांचा समांतर तपास करत असताना सदर पथकास गोपनीय माहिती मिळाली की शिरोली एमआयडीसी पोलिस ठाणे येथे दाखल गुन्हा हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार कृष्णात पोतेकर याने आपल्या साथीदारांसह केला असून चोरलेल्या सेंट्रीग प्लेटा विक्री करण्यासाठी ते चोर मोटारसायकल वरुन शिरोली गावच्या हद्दीतील NH 4 ते अल्ट्राटेक RMC PLANT कडे जाणाऱ्या रोडवर राम सिंटरड प्रॉडक्ट्स जवळ येणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार सदर पथकाने या ठिकाणी सापळा लाऊन
१) कृष्णात प्रकाश पोतेकर, वव २३, जामदार मळा, हातकणंगले कोल्हापूर
२)गुरुराज मालतेश अतनुरे, वय. 23, अष्टविनायक कॉलनी उलपे मळा, कसबा बावडा, कोल्हापूर
३)अक्षय विजय भोसले वव. २६, रामनगर शिये, करवीर, कोल्हापूर
४)निलेश उर्फ सोम्या शिवाजी राऊत वव. २८, जाधव गल्ली शिये, करवीर, कोल्हापूर
५) मोसीर जमीर मोमीन वव. २४, रा. म्हसोबा मंदिर जवळ, हातकणंगले, कोल्हापूर
६)विक्रम दिपक सोनुले वव. २०, रा. पाटील मळा, हातकणंगले कोल्हापूर यांना पकडले असता त्यांच्या कब्जात असणाऱ्या चोरीच्या सेंट्रीग प्लेटा, जबरदस्तीने काढून घेतलेला मोबाईल, चोरीची मोपेड, राउटर, ब्लूटूथ तसेच चोरी करण्यासाठी वापरलेल्या मोटार सायकल मिळून आल्या.

त्यानंतर त्यांच्याकडे अधिक तपास केला असता त्यांनी शिरोली एमआयडीसी येथे घरफोडी चोरी, राजारामपुरी येथे मोटारसायकल चोरी, इचलकरंजी येथे जबरी चोरी व शिरोळ येथे दोन घरफोडी चोरी अशा एकूण ५ गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून २, १०, ०००रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सपोनि. किरण भोसले, पोलिस उपनिरीक्षक नेताजी डोंगरे, तसेच पोलिस अंमलदार श्रीकांत मोहिते, रामचंद्र कोळी, अनमोल पवार, वैभव पाटील, विनोद कांबळे, आसिफ कलायगार, उत्तम सडोलीकर, संजय पडवळ, संतोष पाटील, राजेंद्र वरंडेकर, रफिक आवळकर, अनिल जाधव व सायबर पोलीस ठाण्याकडील अमर वासुदेव यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -