मलायका अरोरा (Malaika Arora)आणि अमृता अरोरा (Amrita Arora) अनेकदा एकत्र दिसतात. दोन बहिणींमधील प्रेम सर्वांचे लक्ष वेधून घेते. आता दोघींची वेब सीरिज लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करेल. दोन्ही बहिणी ‘अरोरा सिस्टर्स’ (Arora Sisters) या वेब सीरिजमध्ये एकत्र दिसणार आहेत, जिथे त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही पैलू आणि रहस्ये जगासमोर उलगडली जातील. या शोच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना त्यांची लाइफस्टाइलपासून ते वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यापर्यंत सर्व गोष्टींशी कळणार आहेत. ‘अरोरा सिस्टर्स’ हॉटस्टारवर प्रसारित होणार आहे.
पिंकविलाच्या रिपोर्टनुसार, मलायका आणि अमृता या सीरीजमध्ये त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल बोलताना दिसणार आहेत. या शोमध्ये दोन्ही बहिणी त्यांच्या आयुष्यातील अनुभव सांगणार आहेत. हा शो त्यांच्या चाहत्यांसाठी या दोघींनाही चांगल्या प्रकारे जाणून घेण्याची एक उत्तम संधी असेल. या शोमध्ये दोघींच्या जवळच्या मित्रांचीही माहिती मिळणार आहे आणि चाहत्यांना त्यांच्या लाइफस्टाइल आणि कुटुंबाविषयीही जाणून घेता येणार आहे. मात्र ही सीरीज कधी येणार याविषयी खुलासा होऊ शकलेला नाही. मात्र चाहत्यांना या सीरीजची प्रतिक्षा आहे.
अजून एका शोमध्ये एकत्र दिसणार दोघी बहिणी
या शोनंतर अमृता अरोरा आणि मलायका अरोरा आणखी एका शोमध्ये दिसणार आहेत. पण या दुसऱ्या शोमध्ये दोघींची गर्ल गॅंग असणार आहे. बॉलिवूडमधील या प्रसिद्ध चेहऱ्यांची एक गँग आहे. म्हणजेच करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan), करिश्मा कपूर (Karishma Kapoor) यांचाही यात सहभाग असणार आहे. ज्यामध्ये या चौघी पार्टी आणि वर्कफ्रंटबद्दल अनेक गोष्टी सांगतील. या चौघी बेस्ट फ्रेंड्स आहेत. नेहमीच त्या एकत्र पार्टी करताना दिसत आहेत. त्यांची मैत्री बॉलिवूडमध्ये सर्वांनाच माहिती आहे. मलायका अरोरा आणि अमृता अरोरा या खऱ्या बहिणी आहेत, तर करीना आणि करिश्मा याही खऱ्या बहिणी आहेत. अशा वेळी या चौघींना एका शोमध्ये एकत्र पाहणे चाहत्यांसाठी खूप रोमांचक असेल. मलायकाबद्दल बोलायचे झाले तर ती सध्या अर्जुन कपूरला (Arjun kapoor) डेट करत आहे.