Saturday, February 21, 2026
Homeसांगलीतासगावात विवाहितेचा विनयभंग

तासगावात विवाहितेचा विनयभंग

तासगाव येथील एका भागातील महिलेचा विनयभंग करून तिच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र पळविल्या प्रकरणी रोहित गजाजन खराडे (वय २८, रा. माळी गल्ली, तासगाव ) याला तासगाव पोलिसांनी अटक केली आहे.

फिर्यादीच्या घरी कामानिमित्त येणाऱ्या मुलांना संशयित रोहित हा शिवीगाळ करीत होता. याचा जाब फिर्यादीच्या सासऱ्यांनी रोहित याला विचारला. याचा राग धरून रोहितने फिर्यादीच्या सासऱ्यांना त्याच्या घरी येऊन शिवीगाळ केली. दरम्यान, ही शिवीगाळ ऐकून फिर्यादी तेथे आल्या. त्यांनी सासऱ्यांना शिवीगाळ का करता, असे विचारले. त्यावेळी रोहित याने फिर्यादींचा विनयभंग केला. तसेच त्यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र हिसडा मारून घेऊन पलायन केले, असे पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -