Saturday, February 21, 2026
Homeराजकीय घडामोडीदसऱ्यानंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर

दसऱ्यानंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे येत्या ७ ऑक्टोबरपासून कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. राज यांनी अलीकडेच विदर्भाचा दौरा केला केला होता. त्यानंतर आता ते सहा दिवसांच्या कोकण दौरा करणार आहेत.

यात ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात जाणार असल्याचे सांगितले जात आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी राज्यातील विविध विभागांचा दोरा सुरू केला आहे. अलीकडेच त्यांनी विदर्भाचा दौरा केला होता. यात त्यांनी पक्षबांधणीच्या दृष्टीने विविध बैठका घेत महत्वाचे निर्णय घेतले. आता लवकरच ते कोकण दौऱ्यावर जाणार आहेत.

७ ऑक्टोबरपासून हा दौरा सुरु होणार असून कोल्हापूरमार्गे तळकोकणात दाखल होतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यात त्यांचा प्रत्येकी दोन दिवस दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये राज ठाकरे हे मनसे कार्यकत्यांशी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पक्षाच्या कामगिरीचा आढावा घेण्याची देखील शक्यता वर्तविली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -