Saturday, February 21, 2026
Homeब्रेकिंगकवलापूर विमानतळाजवळ एकाचा पाठलाग करुन निघृण खून ; संशयिताचे पलायन

कवलापूर विमानतळाजवळ एकाचा पाठलाग करुन निघृण खून ; संशयिताचे पलायन

मिरज तालुक्यातील बुधगाव येथे राहणाऱ्या विठ्ठल बाळकृष्ण जाधव (वय ४० रा. ) याचा नियोजित विमानतळाच्या खुल्या जागेत धारदार शस्त्राने डोक्यावर, मानेवर वार करत खून करण्यात आला. विठ्ठल जाधव हा सेंट्रिंग कामगार म्हणून काम करीत होता. खूनाची घटना दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घटना घडली असल्याचा पोलिसांचा कयास आहे. खून नेमक्या कोणत्या कारणाकरिता करण्यात आला याचे कारण गुलदस्त्यात असून घटनास्थळावरुन हल्लेखोर पसार झाले आहेत. पाठलाग करुन खून झाल्याची चर्चा परिसरात होती.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विठ्ठल जाधव हा बुधगावमध्ये कुटुंबासह राहतो. तो मागील काही वर्षापासून सेंट्रीगचे काम करीत होता. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे तो घरातून कामासाठी बाहेर पडला होता. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तो कामावरुन गेला असल्याचे समजते. त्यानंतर त्याचा कुटुंबाशी काही संपर्क नव्हता. दरम्यान दुपारी काही तरूण विमानतळाच्या परिसरात जात होते. त्यावेळी त्यांना एकजण रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. हे पाहून त्यांनी  त्यांनी तातडीने कवलापूरमधील काहींना माहिती दिली.

ही माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याला कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलीस तपासात विठ्ठल याच्या डोक्यावर, कपाळावर, तोंडावर, पायावर धारधार शस्त्राने वार केल्याचे निष्पन्न झाले आहे.पोलिसांनी पंचनामा करून तातडीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नेण्यात आला. त्यावेळी धारधार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी रक्ताने माखलेला स्टिलचा तांब्या, बांधकामाचे साहित्य, चप्पल अशा वस्तू पोलिसांना आढळून आल्या आहेत. तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी होती. 

मात्र हा खून नेमका कोणी केला, त्या मागचे कारण काय हे मात्र अद्याप समजू शकले नाही. रात्री उशीरापर्यंत या घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी शहर विभागाचे उपाधीक्षक अजित टिके यांनी भेट दिली. तपासाच्या सूचना दिल्या. ग्रामीणचे सहायक निरीक्षक प्रदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक किरण मगदूम, सागर पाटील, अंमलदार रमेश कोळी, संदीप मोरे, कपिल साळुंखे, महेश जाधव हे तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -