Sunday, August 3, 2025
Homeमनोरंजनएंटरटेनमेंट बॅक टू बॅक होणार, 20 पेक्षा जास्त सिनेमे होणार रिलीज, ही...

एंटरटेनमेंट बॅक टू बॅक होणार, 20 पेक्षा जास्त सिनेमे होणार रिलीज, ही घ्या यादी…

यंदाच्या आठवड्यात सिनेमांमागे सिनेमे रिलीज होणार आहेत. यामुळे तुमचं मनोरंजन आता बॅक टू बॅक होणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हिंदी, मराठी, तेलुगू सिनेमे एकाच वेळी प्रदर्शित होणार आहेत. ही सिनेमांची मेजवानी कधी हे जाणून घेण्यासाठी वाचा यादी..

‘गोदावरी’ आणि ‘कुलस्वामिनी’ हे मराठी सिनेमे येत्या 11 नोव्हेंबरला रिलीज होणार असून मराठी रसिकांना हे सिनेमे या आठवड्यात चित्रपटगृहांत पाहता येणार आहेत.

11 नोव्हेंबरला 8 हिंदी चित्रपट चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहेत. दक्षिणेतील अभिनेत्री समंथा प्रभूचा ‘यशोदा’, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन आणि अनुपम खेर यांचा ‘उचाई’, योद्धा, रितेश देशमुखचा ‘मिस्टर मम्मी’, ‘एंट द एंड’, ‘थाई मसाज’, ‘रॉकेट गँग’, ‘करतुत’ आणि ‘बधाई हो बेटी हुई है’ असे हे सिनेमे आहेत.

तमिळ आणि तेलुगू: 11 नोव्हेंबर रोजी ‘माझी’ आणि यशोदा हे तेलुगु सिनेमे रिलीज होणार आहे. तर तमिळ सिनेमे ‘अगिलन’, ‘गिला बेट’ आणि ‘पॅरोल’ हेदेखील 11 नोव्हेंबरला रिलीज होणार आहेत.

कन्नड सिनेमे या आठवड्यात होणात रिलीज: यशोदा’, ‘राणा’, ‘ओ कन्नड’, कॉमेडी ड्रामा फिल्म ‘दिलपसंद’ व ‘यलो गँग्स.

पंजाबी सिनेमे देखील या आठवड्यात रिलीज होणार आहेत. ‘छोबर’, ‘कुलचे छोले’ आणि ‘मसंद’ अशी त्यांची नावे आहेत. रील्स स्टार जन्नत जुबेर ‘कुलचे छोले’ सिनेमातून चित्रपट सृष्टीत पदार्पण करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -