Monday, August 4, 2025
Homeमहाराष्ट्रएसटी महामंडळात 10 वी पासला संधी; 28 नोव्हेंबर पर्यंत करा अर्ज :...

एसटी महामंडळात 10 वी पासला संधी; 28 नोव्हेंबर पर्यंत करा अर्ज : वाचा आत्ताच

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. एसटी महामंडळाच्या चंद्रपूर आगारात काही जागांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकर भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करावे लागणार आहेत. या नोकर भरतीबाबत सविस्तर जाणून घेऊ या..

एकूण जागा – 83

पुढील पदासाठी भरती – शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता

शिकाऊ उमेदवार पदांसाठी दहावीपर्यंत शिक्षण झालेलं असावं.
उमेदवारांनी संबंधित विषयांत आयटीआय केलेलं असावं.
कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्था किंवा विद्यापीठातून शिक्षण झालेलं असावं
संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक.
संबंधित पदभरतीच्या सर्व अटी व शर्थी पूर्ण केलेल्या असणं आवश्यक.
आवश्यक कागदपत्रे
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (राखीव उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 28 नोव्हेंबर 2022

अर्ज करण्यासाठीचा पत्ता – महाराष्ट्र राज्य परिवहन, चंद्रपूर विभाग, चंद्रपूर.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा –https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/5eb44cdcb0f6ba140d2879a4

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -