Homeकोल्हापूरऔषधांसाठी लागणाऱ्या केमिकलच्या नावाखाली मद्याची तस्करी, कोल्हापुरात ३० लाखांचा मुद्देमाल जप्त

औषधांसाठी लागणाऱ्या केमिकलच्या नावाखाली मद्याची तस्करी, कोल्हापुरात ३० लाखांचा मुद्देमाल जप्त


कोल्हापूर : औषधांसाठी लागणा-या केमिकलची वाहतूक करीत असल्याचे भासवत गोवा बनावटीच्या मद्याची तस्करी करणारा ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने पकडला. १४ लाखांचे मद्य आणि ट्रक असा सुमारे ३० लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोल नाक्यावर आज, मंगळवारी (दि. १५) दुपारी ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली. इब्राहीम हर्क खान (वय २२) आणि सत्तार मिठा खान अशी या दोघांची नावे
आहेत.

याबाबत माहिती अशी की, गोवा बनावटीचे मद्य घेऊन एक ट्रक पुण्याच्या दिशेने जाणार असल्याची माहिती एलसीबीचे हावलदार सुरेश पाटील आणि आसिफ कलायगार यांना मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक संजय गोर्ले यांच्यासह विनायक सपाटे आणि त्यांच्या पथकाने पुणे-बेंगळुरू महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ सापळा रचला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -