मिरज पंढरपूर रोड शासकीय महाविद्यालयापुढे वजांळे पेट्रोल पंपा समोर आज एक अपघात घडला आहे. शासकीय महाविद्यालय एमबीबीएस ला पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या दोन तरुणांना बसने ठोकर दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की मिरज पंढरपूर रोडवर वजांळे पेट्रोल पंपा समोर शासकीय महाविद्यालय मिरज एमबीबीएस पहिले वर्षाला दोन तरुण शिकण्यासाठी आहेत.ते आपले काॅलेज करुन हाॅस्टेलवर रोड क्राॅसिंग करुन जात असताना स्पीड ब्रेकर नसल्याने तासगावहून मिरजेकडे बस जोरात येत होती.त्यामुळे या विद्यार्थ्यांना बसची जोरात धडक बसली विद्यार्थ्यी हे किरकोळ जखमी झाले आहेत.स्पीड ब्रेकर नसल्याने हा अपघात झाला आहे असे उपस्थित मेडिकल विद्यार्थ्यांनी माहीती दिली.





