Sunday, February 22, 2026
Homeब्रेकिंगसेक्स रॅकेटचा पर्दाफाश! तरुणींची सुटका, दलाल दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या

सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! तरुणींची सुटका, दलाल दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या

पुण्यातील पिंपरी-चिंचवड (Pimpari Chinchavad) परिसरातील हिंजवडी पोलिस स्टेशनच्या (Hijwadi Police) हद्दीत सेक्स रॅकेटचा (Sex Racket) भंडाफोड झाला आहे. मोबाईलच्या माध्यमातून तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाल दाम्पत्याच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर अनेक तरुणींची सुटका (pimpri rescue) करण्यात आली आहे.

दलाल पती-पत्नीवर अनैतिक मानवी वाहतूक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी आणि परिसरात मोबाईलवर फोटो पाठवून तरुणींना लॉज आणि हॉटेलवर पोहोचवलं जात होतं. पीडित तरुणींकडून जबरदस्तीनं देहविक्री करून घेतली जात होती. याबाबत पोलिसांनी गोपनिय माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली.

दुसरीकडे, ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनप्रकरणी पुण्यातील दत्तवाडी पोलिसांनी राजस्थानात मोठी कारवाई केली आहे.
राज्यभरात ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंडला बेड्या ठोकल्या आहेत. अन्वर सुबान खान (वय – 29, रा. गुरूगोठडी, ता.लक्ष्मनगढ, जि.अलवर, राज्य-राजस्थान) असे आरोपीचं नाव आहे. आरोपीच्या धमकीमुळे पुण्यात एका तरुणाने बिल्डिंगवरून उडी मारुन आत्महत्या केली होती.

तरुणाला पाठवला होता अर्धनग्न फोटो..
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनप्रकरणी पोलिसांत आधीच तक्रार दाखल झाली होती. फिर्यादी तरुणाला इन्स्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या 19 वर्षीय लहान भावाचा अर्धनग्न फोटो पाठवण्यात आला होता. तो फोटो, व्हिडीओचा स्क्रिनशॉट होता. नंतर आरोपीने तो फोटो डिलीट केला होता. मात्र, फिर्यादीच्या भावाच्या मैत्रीणीने फोन करून त्याला सांगितलं की, कोणीतरी इन्स्टाग्रामवरून न्यूड व्हिडीओ कॉलकरून ब्लॅकमेल करत आहे. आतापर्यंत आरोपीने त्यांच्याकडून 4500 रुपये उकळले आहेत. त्यानंतर देखील आरोपी फिर्यादीच्या भावाला ब्लॅकमेल करत होता. अखेर बदनामीच्या भीतीने फिर्यादीच्या भावाने 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती. याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर आता पोलिसांना आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळालं आहे .

पोलिसांनी सापळा रचून आरोपीला केली अटक…
आरोपी राजस्थानात असल्याची माहिती पुणे पोलिसांना खबरीच्या माध्यमातून मिळाली होती. पोलिस आरोपीच्या गावी पोहोचले असता, आरोपीच्या नातेवाईकांनी आणि गावातील लोकांनी पोलिसांना विरोध केला. तसेच पोलिसांवर दगडफेक करून आरोपीला पळून जाण्यात मदत केली. मात्र, पुणे पोलिसांनी आरोपीचा अडीच किलोमीटर पाठलाग करून त्याला अटक केली.

सेक्सट्रॉर्शनचे ऑनलाईन प्रशिक्षण

या प्रकरणातून मोठी माहिती उजेडात आली आहे. राजस्थान गावातील गुरूगोठडी हा सेक्सट्रॉर्शन गड आहे. येथे सर्वाधिक मुले व महिला अशाप्रकारचे ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनचे प्रशिक्षण घेवून नागरिकांना ब्लॅकमेल करून त्यांच्याकडून खंडणी वसूल करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -