पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार धैर्यशील मदने या टोळीस पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी सांगली व सातारा या दोन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधी करता तडीपरीचा आदेश पारित केला आहे पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धैर्यशील विक्रम मदने वय 20 रोहन शंकर होवाळे वय 21 अनिकेत रवींद्र लोहार वय 22 सर्वजण राहणार रामानंदनगर पलूस तालुका पलूस या टोळी विरुद्ध सन 2019 ते 2022 मध्ये पलूस पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे मालमत्ता जबरीने घेण्यासाठी घातक हत्यारांनी इच्छापूर्वक दुखापत पोहोचवणे मारहाण करणे शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देणे सार्वजनिक मालमत्तेचे विरूपण व विद्रूपीकरण करणे असे गंभीर स्वरूपाचे चार गुन्हे दाखल होते.
त्यामुळे या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये पलूस पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस अधीक्षकांकडे प्रस्ताव सादर केला होता. सदर प्रस्तावाचे पोलीस अधीक्षक बसवराज तेली यांनी अवलोकन करून चौकशी अधिकारी म्हणून श्रीमती अश्विनी शेंडगे उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग यांची नियुक्ती करून त्यांच्याकडून आलेला चौकशी अहवाल तसेच प्रस्तावाचे सुनावणी दरम्यान या टोळीच्या हालचाली या सर्व बाबींचा विचार घेऊन याबाबतची सलग सुनावणी घेऊन नैसर्गिक न्याय तत्वाचा व्यापक विचार करून या टोळीला महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 मधील तरतुदीनुसार सांगली व सातारा या दोन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधी करता तडीपरीचा आदेश पारित केला आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक बसवराज तेली, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहा पोलीस निरीक्षक विकास जाधव, सिद्धार्थ दीपक गट्टे नंदकुमार कदम, नितीन घोडे यांनी केली आहे.






