ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर राजारामपुरी पोलिस ठाणे येथे अभिजीत जोती नागावकर वय वर्षे ३५ राहणार प्लॅट २०२ दुसरा मजला एच व्हीन अयोध्या पार्क ओल्ड पी.बी रोड कोल्हापूर एका इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी याची १ कोटी ७६ लाख ८० हजार रुपयाची फसवणूक झाली होती. तरी सदर गुन्ह्यातील नमूद आरोपी हा राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी होता.
तरी विश्रामबाग शाखेतील गुन्हे प्रकटिरण शाखे कडील पथक हे पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अभिजीत नागावकर हा शंभर फुटी रोड आर्मी कॅन्टीन जवळ संशयितरित्या त्याच्या गाडी मध्ये बसलेला दिसून आला. त्याचा गुन्हे प्रकटीकरण शाखेस संशय आल्याने त्याचेकडील विचारपूस केल्याने अभिजीत नागावकर हा आरोपी असून राजारामपुरी पोलिस ठाणे कोल्हापूर येथील फसवणूकीच्या गुन्ह्यात फरारी असल्याचे समजले. तरी तरी अभिजीत नागावकर याला विश्रामबाग पोलीस ठाणे यांनी ताब्यात घेऊन त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला आहे.आणि राजारामपुरी पोलिस ठाणे यांच्या ताब्यात आरोपीला देण्यात आले आहे.