Tuesday, August 5, 2025
Homeराजकीय घडामोडी“कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांची भूमिका मांडतात, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला कुलुप का?”, संजय राऊतांचा...

“कर्नाटकचे मुख्यमंत्री त्यांची भूमिका मांडतात, आपल्या मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला कुलुप का?”, संजय राऊतांचा सवाल

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न अधिकाधिक चिघळत चालला आहे. त्यावर राज्यातील विरोधीपक्ष आक्रमकपणे बोलताना दिसत आहे. तर सत्ताधाऱ्यांकडून मात्र याबाबत मौन बाळगण्यात आलं आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलीय.

आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमचंच. ते आक्रमकपणे त्यांची बाजू मांडत आहे. पण आमचे मुख्यमंत्री कुठे आहेत? ते काहीही का बोलत नाहीत? त्यांच्या तोंडाला कुलुप का?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलतात त्याच्याशी महाराष्ट्राला पडलेला नाही. परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोम्मई यांना कशाप्रकारे उत्तर देतात? मुख्यमंत्री या लढ्यात उतरले आहेत की नाहीत कुठे आहेत, हा प्रश्न आहे. कर्नाटकच्या प्रश्नावरती महाराष्ट्राला मुख्यमंत्र्यांनी तोंड उघडलेला नाही. काल देखील आमचे खासदार हे अमित शहा यांना भेटले आहेत. मिंदे सरकारचे खासदार यावरती गप्प बसलेले आहेत, असं राऊत म्हणालेत.

शिंदेगटाची निशाणी ढाल तलवार नाही. कुलूप पाहिजे. त्यांच्या कुलपाची चावी दिल्लीला आहेत. त्यांच्यात बोलण्याची हिंमत नाही. महाराष्ट्राचा स्वाभिनासाठी पक्ष सोडला मग आता हा स्वाभिमान कुठे आहे? महाराष्ट्राचं अवहेलना पदोपदी करावी. महाराष्ट्राचा अपमान करावा, यासाठी संपूर्णपणे षडयंत्र आहे, असं राऊत म्हणालेत.

पक्षाचे नेते छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात. ज्या शिवाजी महाराजांना आदर्श मानत नाहीत या पक्षाचे राज्यपाल सावित्रीबाई फुले यांचा अपमान करतात. ज्या पक्षाचे मंत्री प्रवक्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली, असं म्हणतात. त्याच पक्षासोबत सध्या हे शिंदेगटाचे नेते आहेत. त्यामुळे हे कर्नाटक प्रश्नावर काय बोलणार? हे सर्व अकलेचे कांदे आहेत, असं राऊत म्हणालेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -