Thursday, July 31, 2025
Homeक्रीडारोहित शर्माची तुफान फटकेबाजी, न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका भारतानं जिंकली

रोहित शर्माची तुफान फटकेबाजी, न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका भारतानं जिंकली


रायपूरमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडेमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला आहे. यासह भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा सामना २४ जानेवारीला इंदूरमध्ये होणार आहे.

टीम इंडियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा ८ गडी राखून पराभव केला आहे. कर्णधार रोहित शर्माची ५१ धावांची खेळी आणि शुभमन गिलच्या नाबाद ४० धावांच्या बळावर भारताने सहज विजय नोंदवला. ३ सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने २-० ने आघाडी घेत मालिका जिंकली आहे.

१०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियासाठी कर्णधार रोहित शर्माने तुफानी इनिंग खेळली. रोहित शर्माने ५१ धावा करत सामना लवकर संपवण्याच्या दिशेने पाऊल टाकले. टीम इंडियाने नुकतीच श्रीलंकेविरुद्धची एकदिवसीय मालिका जिंकली होती, आता न्यूझीलंडचाही पराभव केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -