इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेला आता केवळ एकच दिवस बाकी आहे. 31 मार्चपासून आयपीएलच्या या 16 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे या हंगामासाठी संघांची अंतिम तयारी सुरू झाली आहे. दरम्यान, या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी कर्णधारांचे फोटोशूट झाले आहे. दरम्यान, आयपीएल 2023 हंगामापूर्वी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर कर्णधारांचे आयपीएलच्या ट्रॉफीबरोबर फोटोशूट झाले. त्यांचे एकत्र फोटोही आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आले आहेत. मात्र, या शेअर केलेल्या या फोटोंमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा दिसत नाही.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विजेतेपद कर्णधारच या फोटोंमध्ये नसल्याने अनेक चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. पण रोहित शर्मा या फोटोशूटसाठी का उपलब्ध नव्हता. याबद्दल अद्याप कोणतेही स्पष्टीकरण किंवा कारण देण्यात आलेले नाही.दरम्यान, आयपीएलच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आलेला कर्णधारांचा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या विविध प्रतिक्रियाही येत आहेत.
अनेक चाहत्यांनी रोहित शर्माची विचारणा केली आहे. तर काही युजर्सने रोहित फोटोतून गायब असल्याचे पाहून ‘यंदा मुंबई इंडियन्स खेळणार नाही का?’ असा प्रश्नही उपस्थित केला आहे. याशिवाय देखील अनेक भन्नाट कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधार एडेन मार्करम आहे. मात्र, तो अद्याप भारतात आलेला नसल्याने सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करण्यासाठी भुवनेश्वर कुमार फोटोशूटसाठी उपलब्ध होता. मार्करम सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना खेळण्याचीही शक्यता कमी आहे, अशा परिस्थितीत भुवनेश्वर कुमार प्रभारी नेतृत्व करू शकतो.