Friday, November 14, 2025
Homeक्रीडाPBKS vs GT : ऑल इज 'गिल'; गुजरात टायटन्सचा पंजाबमध्येच बल्ले बल्ले!

PBKS vs GT : ऑल इज ‘गिल’; गुजरात टायटन्सचा पंजाबमध्येच बल्ले बल्ले!

आयपीएलमध्ये काल गुजरात टायटन्स  विरूद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगला होता. गुजरात टायटन्सने पंजाबचा 6 विकेट्सने त्यांच्याच घरात पराभव केला आहे. या पराभवामुळे पंजाबला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहेत. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो गुजरातचा फलंदाज शुभमन गिल.

शुभमन गिलच्या जोरावर गुजरातने जिंकला सामना

गुजरात टायटन्सचा ओपनर शुभमन गिलने आजच्या सामन्यात चांगली फलंदाजी केली. फलंदाजी वेळी एक बाजू धरून ठेऊन त्याने शेवटपर्यंत फलंदाजी केली. गिलने 40 बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केलं. मुख्य म्हणजे त्याच्या कारकिर्दीतील हे 16 वं अर्धशतक होतं.

आजच्या सामन्यात गिलने ओपनर रिद्धिमान साहासोबत 48 आणि साई सुदर्शनसोबत 41 रन्सची महत्त्वपूर्ण पार्टनरशीप केली. अखेरच्या ओव्हरमध्ये मात्र सॅम करनच्या गोलंदाजीवर तो 67 रन्स करून बाद झाला.

गुजरातचा तिसरा विजय

पंजाब किंग्जला हरवून गुजरात टायटन्सने आयपीएलच्या यंदाच्या सिझनमध्ये तिसरा विजय नोंदवलाय. या विजयासह गुजरात टायटन्सची टीम आयपीएलच्या पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल 4 टीममध्ये पोहोचलीये. गेल्या वर्षीची आयपीएल हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातनेच जिंकली होती.

पंजाबकडून 154 रन्सचं लक्ष्य

आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय गुजरातसाठी चांगलाच फायदेशीर ठरला. यामध्ये गुजरात टाईट्ससमोर पंजाब किंग्जचे 154 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. गिलच्या खेळीसमोर गुजरातने हे लक्ष 1 बॉल शिल्लक असतान पूर्ण केलं.

पंजाब किंग्जकडून मॅथ्यू शॉर्टने सर्वाधिक म्हणजेच 36 रन्स केलेत. याशिवाय इतर कोणत्याही खेळाडूला 30 पेक्षा अधिक रन्स करता आले नाहीत. गुजरातकडून मोहित शर्माने दोन विकेट्स घेतले.

दोन्ही टीम्सची प्लेईंग 11

गुजरात टायटन्स- ऋद्धिमान साहा (विकेटकीपर), शुभमन गिल, साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), डेविड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, अल्जारी जोसेफ, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ लिटिल

पंजाब किंग्स- प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, भानुका राजपक्षे, जितेश शर्मा (विकेटकीपर), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत बराड़, कगिसो रबाडा, ऋषि धवन, अर्शदीप सिंह

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -