Monday, February 16, 2026
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र एसटी जोमात, वडाप मात्र कोमात!

महाराष्ट्र एसटी जोमात, वडाप मात्र कोमात!

महाराष्ट्र एसटी जोमात आणि वडाप कोमात अशाच प्रकारचे चित्र वडापचालकांत दिसून येत आहे. राज्य शासनाने महिलांना एसटी तिकीट मध्ये ५०टक्के सुट दिल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण असल्याचे असून एसटी हाऊसफुल्ल मार्गावर सुसाट धावत आहे.

महिला देवदर्शनासह, सहली व गावोगावी फिरत आहेत. सरकारने आमच्या हिताचे काम केल्याचे त्या सांगत आहेत. इकडे अगोदरच वडापवाले कर्ज घेऊन रोजी रोटीचा रोजगार करीत असताना शासनाने त्यात महिलांना दरात सुट दिल्याने वडाप धारकांची अवस्था वाईट झाली आहे. सध्या एसटी तोट्यात नसून ती फायद्यात आहे, कारण ५०टक्के रक्कम शासन प्रति महिना अनुदान देत असते, या पुर्वी शासनाला एसटी कामगार, मेंट्स व इतर सुविधा करीता अनुदानाची वेगळी तरतूद करावी लागत असत,आता मात्र महामंडळाच्या सर्व अडचणी दूर करुन सामान्य, गरजू प्रवाशांना दळणवळण पुढे नेणे गरजेचे आहे.

महायुतीच्या काळात एसटी कामगार संघटनेच्या संपामुळे अनेक एसटी कामगारांच्या संप व मागणीमुळे तत्कालीन राज्य शासनाने कोणत्याही प्रकारची ठोस काम न केल्याने अनेक कामगार मयत झाले. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत या सरकारने कामगारांना विश्वासात घेऊन काम चालवले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -