Friday, February 7, 2025
Homeअध्यात्मशांत झोप हवी असेल तर करा हे चमत्कारिक उपाय!

शांत झोप हवी असेल तर करा हे चमत्कारिक उपाय!

मित्रांनो प्रत्येकालाच दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रात्रीची झोप शांत हवी असते. म्हणजेच कोणतेही विचार आपल्या मनामध्ये येऊ नये, डोक्यात येऊ नयेत आणि आपल्याला शांत झोप यावी असे वाटतच असते. परंतु बऱ्याच लोकांना संध्याकाळी झोपल्यानंतर अनेक विचार डोक्यामध्ये येत राहतात आणि विचार करून त्यांना खूप टेन्शन येते आणि रात्रीची झोप त्यांना व्यवस्थित लागत नाही.

रात्रीची झोप अपूर्ण झाल्यामुळे मग दिवसाची सुरुवात देखील चांगली होत नाही. मग आपल्याला कामांमध्ये खूपच आळस येतो. कोणतेही कामांमध्ये लक्ष राहत नाही. तर आज मी तुम्हाला रात्रीची झोप शांत लागण्यासाठी कोणते उपाय करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला शांत झोप लागेल हे सांगणार आहे.

मित्रांनो हे जर उपाय तुम्ही केले तर यामुळे संध्याकाळची तुम्हाला झोप शांत लागेल आणि दिवसाची सुरुवात देखील चांगली होईल. तर तुम्ही संध्याकाळी झोपत असताना पाय आपले स्वच्छ धुवायचे आहेत आणि तळव्यांना तुम्ही मसाज करायचा आहे. तसेच संध्याकाळी झोपताना तुम्ही आपले दक्षिणेकडे पाय करून झोपायचे नाही. तसेच जर तुमच्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती असतील, फोटो असतील, वास्तुपुरुषांचे फोटो असतील तर अशा फोटोकडे देखील आपले पाय होतील अशा रीतीने अजिबात झोपायचे नाही.

तसेच तुम्ही झोपत असताना सैलसर कपडे घालायचे आहेत. कारण जर तुम्ही सैलसर कपडे घातले तर तुमच्या शरीरात हवेचा संचार होतो. तसेच मित्रांनो तुम्ही ज्यावेळेस झोपता त्यावेळेस झोपण्यापूर्वी दीर्घ श्वसन करायचे आहे आणि ध्यान करायचे आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना झोपताना अनेक प्रकारचे विचार येत असतात. दिवसभरात झालेल्या कामांचे आपण ध्यान करत असतो आणि त्यामुळे मग आपणाला झोप लागत नाही.

तसेच अधून मधून आपणाला जाग देखील येत असते. तर अशा वेळेस मित्रांनो तुम्ही झोपताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत राहायचे आहे. यामुळे तुम्हाला संध्याकाळी झोप नक्कीच शांत लागेल.

तर असे हे उपाय जर तुम्ही केले तर तुम्हाला रात्रीची झोप ही शांत लागेल आणि दिवसाची सुरुवात देखील तुमची चांगली होईल. तर हे उपाय तुम्ही अवश्य करून पहा.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -