Monday, July 7, 2025
Homeअध्यात्मतुम्हीसुद्धा करत असाल बुधवारच्या दिवशी या चुका तर लगेच व्हा सावध! अन्यथा...

तुम्हीसुद्धा करत असाल बुधवारच्या दिवशी या चुका तर लगेच व्हा सावध! अन्यथा करावा लागू शकतो आर्थिक समस्यांचा सामना

बुधवारचा दिवस प्रथम पुजनीय देवता श्री गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची भक्ती भावाने पुजा केली जाते. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने गणपती बाप्पा भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. यासोबतच बुधवारच्य संदर्भात शास्त्रामध्ये अनेक नियम सांगण्यात आले आहेत, ज्यांचे पालन या दिवशी करणे आवश्यक आहे, परंतु काही लोकांना या नियमांची माहिती नसते आणि माहिती नसल्यामुळे ते अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. याचा परिणाम कुटुंब आणि जीवनावर होतो. यासोबतच बुध ग्रहाचा अशुभ प्रभावही कुटुंबावर पडू लागतो. चला तर मग जाणून घेऊया बुधवारी कोणते काम टाळावे.

बुधवारच्या दिवशी या चुका टाळा
शास्त्रानुसार बुधवारी कोणत्याही व्यक्तीला पैसे उधार देणे टाळावे. या दिवशी पैसे उधार देणे अशुभ मानले जाते. यासोबतच या दिवशी उधार दिलेल्या पैशामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते.
शास्त्रानुसार बुधवारी दुधापासून बनवलेल्या खीर, रबरी यांसारख्या गोष्टी टाळाव्यात.
शास्त्रानुसार बुधवारी नवीन कपडे घालू नयेत तसेच या दिवशी नवीन कपडे खरेदी करू नयेत. असे केल्याने तुम्हाला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते.
बुधवारी कोणत्याही तृतीय पंथांचा अपमान करू नये. कारण असे केल्याने तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते. यासोबतच जर तुम्हाला या दिवशी एखादा तृतीय पंथ दिसला तर त्याला काहीतरी दान करा.
केसांशी संबंधित कोणतीही वस्तू जसे की कंगवा, तेल, साबण, हेअर ड्रायर बुधवारी खरेदी करू नये. असे केल्याने बुध कमजोर होतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -