Tuesday, April 30, 2024
Homeब्रेकिंगप्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निधन; साऊथ इंडियन सिनेमात...

प्रसिद्ध बॉडी बिल्डरचं वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी निधन; साऊथ इंडियन सिनेमात केलं होतं काम

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जर्मन बॉडी बिल्डर आणि युट्यूब स्टार जो लिंडनर याचं वयाच्या 30व्या वर्षी निधन झालं आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. डोक्याची नस फाटल्याने त्याचं निधन झाल्याचं सांगण्यात आलं. जो लिंडनरला जोएस्थेटिक्स या नावानेही ओळखलं जायचं. अवघ्या कमी वयात आपल्या बॉडी बिल्डिंगमुळे लोकप्रिय झाला होता. तो जगभरातील तरुणांचा प्रेरणास्त्रोत होता. मात्र, त्याचं अचानक निधन जाल्याने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

जो लिंडनरच्या निधनानंतर त्याचा मित्र नोएल डेजल याने शोक व्यक्त केला आहे. लिंडनरच्या आत्म्याला शांती मिळो. तुझा फोन येईल म्हणून मी नेहमी फोन चेक करायचो. जीमला जाण्याचा तुझा निरोप यायचा म्हणून मी सतत फोन चेक करत असतो. आता तुझ्या जाण्याने मी कोलमडून गेलो आहो. तू आमच्यासाठी अनेक महत्त्वाचे सल्ले दिलो होते. स्वत:चं आयुष्य आणि सोशल मीडियाच्याबाबत बरंच काही सांगितलं होतं. तुझी उदारता नेहमीच आमच्या स्मरणात राहील, असं नोएलने म्हटलं आहे.

भयंकर आजाराने ग्रासले
जो लिंडनरने रश्मिका मंधाना अभिनित पोगारू या साऊथ इंडियन सिनेमातही काम केलं होतं. लिंडनरला एन्यूरिझ्म नावाचा धोकादायक आजार झाला होता. हा आजार साधारणपणे डोकं, पाय आणि पोटात होत असतो. भारतात या आजाराची फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे दरवर्षी हजारो लोकांचा या आजाराने मृत्यू होतो.

लक्षणे काय?
या आजाराची लक्षणं सांगणं कठिण आहे. कारण त्याची लक्षणे बाहेर दिसत नाही. शरारीच्या एखाद्या भागातून अचानक रक्त येणं, हृदयाची धडधड अचानक वाढणे, नसांमध्ये प्रचंड वेदना होणं, चक्कर येणं, डोकं गरगरणं, डोळ्यांना वर किंवा खाली वेदना होणं, या आजााराची ही प्रमुख लक्षणे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -