ताजी बातमी ऑनलाईन टीम
१६ ऑगस्ट २०२३ | कोपरगाव मतदारसंघातील काळे आणि कोल्हे हे पारंपारिक राजकीय विरोधक आहेत. अनेकदा दोन्हींमध्ये राजकीय संघर्ष पहायला मिळतो. काल देखील कोपरगाव तालुक्यातील गवारेनगर येथील रस्त्याच्या भुमिपूजन फलकावरून काळे आणि कोल्हे समर्थकांमध्ये मोठा राडा पहायला मिळाला. एकमेकांना धक्काबुक्की शिवीगाळ करत दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अजित पवार शिंदे-फडणवीस यांच्या सोबत गेल्यानंतर अनेक विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये राजकीय संघर्ष होत आहे. कोपरगाव मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे आणि भाजपचे नेते तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे समर्थकांमध्ये भुमिपूजन फलकावरून वाद झाला. कोपरगाव शहरातील गवारेनगर येथे रस्त्याच्या भुमिपूजन फलकावरून हा वाद विकोपाला गेला.
दोन्ही नेत्यांनी रस्त्याच्या निधीबाबत दावा केला. भाजपच्या बोर्डसमोरच काळे समर्थकांनी बोर्ड उभा केला त्यानंतर दोन्ही समर्थक एकमेकांना भिडले. आमदार काळे आणि विवेक कोल्हे हे दोन्ही नेते कार्यक्रमस्थळी पोहचल्यानंतर जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ उडाला. यावेळी दोघांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हान दिले.
भूमिपूजन फलकावरून वाद शिगेला, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना कुठे भिडले?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -