Monday, August 4, 2025
Homeब्रेकिंगपीएफ खात्यावर टॅक्स फ्री व्याज मिळते का, निवृत्तीनंतर किती काळ पैसे ठेवता...

पीएफ खात्यावर टॅक्स फ्री व्याज मिळते का, निवृत्तीनंतर किती काळ पैसे ठेवता येतात? जाणून घ्या नियम

सरकारी किंवा खासगी कर्मचाऱ्यांना आपल्या भविष्य निर्वाह निधीमध्ये म्हणजेच इपीएफ खात्यात मासिक योगदान जमा करावे लागत असते. रिटायरमेंटच्या वेळी आपले इपीएफ खाते मॅच्युअर्ड होते. पण योजनेतील बरीच माहिती सरकारी कर्मचाऱ्यांना नसते. तर याविषयी माहिती जाणून घेऊया.भविष्य निर्वाह निधी रक्कम व व्याजकर्मचारी सरकारी नोकरीत असो किंवा खासगी त्याला आवल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात दरमहा ठराविक रक्कम भरावी लागतेच.

सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजने अंतर्गत आपल्या पगारातून दहा टक्के रक्कम पीएफ खात्यात जमा करावी लागते. तर त्यांच्या खात्यात सरकार १४ टक्के रक्कम जमा करत असते. या खात्यावर मिळणारे व्याज हे करमुक्त असते. तर सरकारी कर्मचारी निवृत्त झाल्यावर मिळणारी रक्कम सुद्धा करमुक्त असते. त्यासाठी काही अटी असतात जाणून घेऊया.सेवानिवृत्तीनंतर पीएफ खात्यात किती काळ पैसे ठेवू शकतात?जोवर कर्मचारी खात्यात पैसे भरत असतो तोवर खाते सक्रिय असते.

जर त्याने नोकरी सोडली तर किंवा निवृत्त झाल्यावर किती काळ पैसा खात्यात ठेवता येतो जाणून घ्या. इपीएफ खात्यातून संपूर्ण रक्कम काढता येऊ शकते. दोन महिन्यांच्या आत दुसऱ्या नोकरीत रुजू न झाल्यास खाते बंद करू शकतो. कर्मचारी सेवानिवृत्तीच्या वेळी इपीएफ बंद केला जाऊ शकतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -