Monday, July 7, 2025
Homeब्रेकिंगकेंद्र सरकारी कंपनीत ४२५ प्रशिक्षणार्थी पदांची भरती, जाणून घ्या अटी व नियम

केंद्र सरकारी कंपनीत ४२५ प्रशिक्षणार्थी पदांची भरती, जाणून घ्या अटी व नियम

इलेक्ट्रिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रॉनिक्स डिल्पोमा इंजिनीअरिंग केलेल्या उमेदवारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारच्या ऊर्जा खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीमध्ये प्रशिक्षणार्थी पदांची भरती करण्यात येणार आहे.येत्या १ सप्टेंबरपासून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ सप्टेंबर २०२३ निश्चित करण्यात आली आहे. तूर्त या भरतीची संक्षिप्त अधिसूचना काढण्यात आली आहे. लवकरच सविस्तर अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली जाईल.

उमेदवाराचं जास्तीत जास्त वय २७ वर्षे असणं गरजेचं आहे.भरावयाची पदे

डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – ३४४

डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) – ६८

डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – १३

उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता

डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा.

डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा.

डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -