Monday, August 4, 2025
Homeब्रेकिंगआताची मोठी बातमी! देशात लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्यता, विरोधकांना धक्का

आताची मोठी बातमी! देशात लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक होण्याची शक्यता, विरोधकांना धक्का

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आताची सर्वात मोठी बातमी समोर येतेय. लोकसभेच्या मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे. येत्या 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलाय.. संसदेचं हे शेवटचं अधिवेशन असू शकतं. या अधिवेशनानंतर विद्यमान लोकसभा बरखास्त करून मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. त्याशिवाय या अधिवेशनात ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक आणणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय. यासह समान नागरी कायदा, महिला आरक्षण विधेयकही याच अधिवेशनात आणलं जाणार असल्याचं समजतंय. विरोधकांना धक्का देण्यासाठी ही रणनीती असल्याचं बोललं जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -