दरवर्षी प्रमाणे याहिवर्षी मोठ्या थाटामाटात *कलानगर गणेशोत्सव मंडळा तर्फे श्री महागणपतीचे स्वागत करण्यात येणार आहे* .श्री गणेशाचे पुजन शास्त्रशुद्ध पद्धतीने कसे करावे यांचे उत्तम उदाहरण म्हणजे कलानगर गणेशोत्सव मंडळ.
याहिवर्षी गणेशोत्सव काळात श्री महागणपतीची नित्य शास्त्रशुद्ध पुजा व विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम श्री महागणपती मंडपामध्ये राबवले जाणार आहेत. *त्यामध्ये प्रथम दिवशी सायंकाळी ६ वाजता* श्री महागणपतीची प्राणप्रतिष्ठापणा होणार असुन गणेशयाग,शहाळे महोत्सव,सामुहिक महिला अथर्वशीर्षपठण,अष्ठफलाहार महानैवेद्यम,महाभोग,सहस्त्रदिपोत्सव सोहळा व पुष्पमहोत्सव अशे अनेक धार्मिक व लक्षवेधी उपक्रम उत्सवकाळात पार पडणार आहेत.
यावर्षी श्री महागणपतीची नव्या रुपातील नित्य वस्त्र परीधान करण्यात येणारी अतिशय देखणी व सुंदर मुर्ती भाविकांना पहावयास मिळणार आहे. खासकरुन यावर्षी श्री महागणपतीस समर्पित स्वराभिषेक व *श्री महागणपती उत्सवमुर्तीचा पालखी सोहळा याचे खास आकर्षण असणार आहे,तसेच केसरी ढोल ताशा पथक यांचेकडुन श्री महागणपतीस मानवंदना देण्यात येणार आहे.*
यंदाचे मंडपकाम हे शेवाळे मंडप व आर्या एंटरटेनमेंट इव्हेंट्स यांच्या संयुक्त विद्यमानाने साकार होत असुन, ऐतिहासिक मंदिराची प्रतिकृतीस अनुसरुन आहे व त्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात सुरु आहे.
गणेशभक्तांचे मन भक्तीभावामध्ये तल्लीन होणार आहे अशा भव्य दिव्य गाभाऱ्याची व स्वागत कमानीची उभारणी होत आहे.विविध प्रकारच्या उपक्रमांसोबत दररोजच्या मंगलआरतीचे *फेसबुक,इंस्टाग्राम व युट्यूब द्वारे थेट प्रक्षेपण* होणार असुन श्री महागणपती दर्शन दररोज सकाळी *९ ते रात्री १२ वाजेपर्यंत* सुरु असणार आहे.
लवकरच मंडळातर्फे पत्रकार परिषद घेऊन माध्यमांमार्फत कार्यक्रमाची रुपरेषा व त्यासंबंधीची अधिक माहिती प्रसारीत करण्यात येणार आहे.सर्व गणेशभक्तांनी सहकुटुंब सहपरिवार मोठ्या संख्येने श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेण्याचे अवाहन कलानगर गणेशोत्सव मंडळातर्फे करण्यात येत आहे.