Sunday, December 22, 2024
Homeब्रेकिंगपाच ते सहा सेकंद ती… फक्त स्टूल उचलण्यास सांगण्याचं निमित्त झालं… संतप्त...

पाच ते सहा सेकंद ती… फक्त स्टूल उचलण्यास सांगण्याचं निमित्त झालं… संतप्त नवऱ्याने असं काय केलं ?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पती-पत्नीमधील भांडणं तर सामान्यपणे सगळीकडे होतच असतात. पण बऱ्याच ही भांडण सुरू होतात, आणि लगेच संपतातही. पण काहीवेळा ही भांडण एवढी टोकाला जातात, की रागाच्या भरात एखादं नको ते कृत्य होऊन बसतं. त्याने आयुष्यभराचं नुकसान होतं किंवा आयुष्यभर मनावर ओरखडे उमटतात.

अशीच एक घटना धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये एका शुल्लक कारणावरून संतापलेला पती त्याच्या पत्नीच्या जीवावरच उठल्याचे पहायला मिळाले. साफसफाई करताना, झाडू मारताना पत्नीने पतीला फक्त स्टूल उचलून बाजूला ठेवायला सांगितलं. मात्र याच मुद्यावरून तो एवढा संतापला की त्याने पत्नीचा जीवच घ्यायचा प्रयत्न केला. खुशाल जाधव असे आरोपी पतीचे नाव असून मानपाडा पोलीसानी या प्रकरणी त्या निर्दयी पतीच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला. मात्र या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी खुशाल जाधव आणि त्याची पत्नी तनिषा हे दोघेही कल्याण पूर्व येथील मलंगडरोड परिसरातील एका सोसायटीमध्ये राहतात. आठ महिन्यांपूर्वी त्या दोघांचे लग्न झाले. मात्र खुशाल हा काहीच काम करत नसल्याने त्या दोघांमध्ये वारंवार भांडण व्हायची. 22 ऑक्टोबर रोजी खुशाल आणि तनिषा हे दोघेही गावी गेले होते. तेव्हा तनिषाच्या मामाला तिच्या गळ्यावर काही व्रण दिसले. हे कसं झालं असं विचारत त्यांनी तिची विचारपूस केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -