Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगकांद्यापाठोपाठ आता खाद्यतेलाच्याही दरात झाली वाढ!

कांद्यापाठोपाठ आता खाद्यतेलाच्याही दरात झाली वाढ!

दिवाळी जवळ आली असताना खाद्यतेलाचे (Refined Oil) दर आठवडाभरात सरासरी सात रुपयांनी वाढले आहेत. केंद्र सरकारने मागील काही महिन्यांत आयात शुल्कात मोठी कपात केल्यानंतरही दरवाढ झाली आहे.

 

सर्वाधिक मागणीच्या पामतेलापेक्षा सोयाबीन तेलाची मागणी बाजारात अचानक वाढलेली दिसत आहे.

 

ऐन दिवाळीत एकीकडे सोयाबीन तेलाची मागणी प्रचंड वाढली असून, भावात वाढ झाल्याचे दिसत आहे. शेंगदाणा, सूर्यफूल, राईस ब्रान तेलाचे दर मात्र स्थिरावलेले आहेत. सोयाबीन तेल महागल्याने गरिबांसह सर्वसामान्य ग्राहकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. यंदा सोयाबीन पिकाला पावसामुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याने उत्पादन कमी झाले आहे. त्यामळे सोयाबीनपासुन तयार होणारी उत्पादने महागली आहेत.

 

सध्या तेलाची मागणी वाढल्याने सोयाबीनसह पामतेलाची आयात करावी लागत आहे. प्रामुख्याने पंधरा दिवसांपूर्वी सोयाबीन तेल दर तब्बल सात रुपयांनी प्रतिकिलो) कमी होते. आठ दिवसांपूर्वी 1500 रुपयांवर असलेला (15 किलो) डबा 1600 रुपयांवर गेला आहे. सप्टेंबर अखेरीस सोयाबीनची स्थिती चांगली होती. त्यामुळे या तेलाच्या किमतीही 115 ते 122 रुपये किलोवर स्थिर होत्या. मात्र, सोयाबीनचे उत्पादन घटल्यामुळे ग्राहकांना महागाईचे चटके बसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -