अंतरवाली सराटीजवळून छगन भुजबळ यांनी एल्गार पुकारलाय. भुजबळ मराठवाड्याच्या दौऱ्यावर असून, छत्रपती संभाजीनगर येथून बीडकडे जातांना त्यांचे अंतरवाली सराटी फाट्यावर समर्थकांकडून भुजबळ यांचं भव्य स्वागत करण्यात आले. येत्या 17 तारखेला जालना जिल्ह्यातल्या अंबड येथे ओबीसींच्या महामोर्चाच आयोजन केलं असून, आमंत्रणाची वाट न पाहता मोठ्या संख्येने एकत्रित येण्याचा आवाहन भुजबळ यांनी केले आहे. मराठा आरक्षणावरून पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ थेट आक्रमक होतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान, दरम्यान, यावेळी बोलतांना भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. मात्र, सोशल मीडियावर छगन भुजबळांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यावर आता मनोज जरांगे यांनी आपलं मत ठामपणे मांडलं आहे.
जसं बाकीचे समाज आरक्षणासाठी एक झाले तसे मी माझ्या ओबीसी समाजाला आवाहन करू शकतो एवढंच त्यात होतं. मी ओबीसीच्या घरावर नाही म्हणलो सगळ्या ठिकाणी जे आहे आक्रमण सुरू झालेला आहे. ओबीसी आरक्षणावरून त्यानिमित्ताने आमदाराचे घर पेटवल्या जात आहे. ओबीसी कार्यकर्त्यांचे हॉटेल पेटवल्या जात आहे या संदर्भात आपण सध्या कुठेतरी बोललं पाहिजे एक आवाजामध्ये बोललो पाहिजे हा त्याचा अर्थ आहे. जसं दुसरे समाज आवाहन करू शकतात तसं मी ओबीसी समाजातील 375 जातींना आवाहन करू शकतो की आपण आपलं दुःख मांडलं पाहिजे आणि ते एक मुखाने मांडलं पाहिजे, असं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलंय.
करेंगे या मरेंगे हा त्यांचा प्रश्न आहे. आमचं वाक्य आहे लडेंगे और जितेंगे , त्यांना काय बोलायचं बोलू द्या,आमचं वाक्य लढणार आणि जिंकणार आहे. सगळी जनता आमची आहे, आम्हाला अजून आरक्षण मिळाले नाही मग आम्ही अतिक्रमण कुठं केले आणि आम्ही जे मागतोय ते आमच्या हक्काचे आहे. कोण काय टीका करेल याकडे आम्ही लक्ष देणार नाही.. आमचं लक्ष आता फक्त आरक्षण कडे आहे. वडेट्टीवार यांचं भुजबळ यांना पाठिंबा आहे मात्र त्यांचा कुणालाही पाठिंबा असतो, आम्हालाही त्यांचा पाठिंबा आहे, वड्डेटीवार म्हटले होते मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या, आमची त्यांची व्यथ एकच… भुजबळ यांची ऑडिओ क्लिप मी ऐकली नाही, राज्यात अशांतता करण्याचा त्यांचा प्रश्न आहे का असा प्रश्न आम्हाला पडलाय ते कितीही एकत्र आले, दडपण आणण्याचा प्रयत्न केला तरी आमचं मराठ्यांचा लक्ष विचलित होणार नाही, असं जरांगे यांनी स्पष्टच म्हटलं आहे.