Home ब्रेकिंग मद्यपीनों सावधान! विषारी दारू प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू

मद्यपीनों सावधान! विषारी दारू प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू

0
मद्यपीनों सावधान! विषारी दारू प्यायल्याने ६ जणांचा मृत्यू

मद्यपान आरोग्यासाठी घातक असूनही अनेक जण मद्यपान करतात. गेल्या काही वर्षांत विषारी दारू प्यायल्याने अनेकांचे बळी गेले आहेत. यातच आता विषारी दारू प्यायल्याने ६ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

ही धक्कादायक घटना यमुनानगरमध्ये घडली असून या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

 

यमुनानगर जिल्ह्यातील मांडेबारी आणि पणजेतो गावातील हे प्रकरण आहे. मांडेबारी गावात विषारी दारू पिऊन एकामागून एक ४ जणांचा मृत्यू झाला. याशिवाय मांडेबारी शेजारील पणजेतो गावातील माजरी येथेही दोन जणांना जीव गमवावा लागला आहे. रवींद्र कुमार, सुरेश कुमार, सुरेंद्र कुमार, विशाल सरवन आणि मेहर चंद अशी मृतांची नावे आहेत, तर प्रिन्सची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

या घटनेमुळे दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे. यमुनानगरचे पोलीस अधीक्षक गंगाराम पुनिया यांनी स्वत: घटनास्थळी धाव घेत सर्व वस्तुस्थितीचा गांभीर्याने तपास केला. या प्रकरणी काही चौकशीही करण्यात आली आहे, मात्र पोलीस अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेले नाहीत.