Thursday, July 3, 2025
Homeब्रेकिंगगोचिडाप्रमाणं जनतेचं रक्त पिऊन जगलात, म्हणून तुमच्यावर तुरुंगात पिठलं-भाकरी खायची वेळ आली;...

गोचिडाप्रमाणं जनतेचं रक्त पिऊन जगलात, म्हणून तुमच्यावर तुरुंगात पिठलं-भाकरी खायची वेळ आली; जरांगेंचा भुजबळांवर पलटवार

 

मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) जीव गेला तरी हरकत नाही. एक इंचही मागे हटणार नाही. ही न्यायाची लढाई असून, तिच्या आडवा कोण आला, तर त्याला सोडणार नाही, असा रोखठोक इशारा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांनी येथे दिला.मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना वेळीच न रोखल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल; अन्यथा ही त्यांची भूमिका आहे का, याचा खुलासा करावा, असेही ते म्हणाले. सकल मराठा समाजातर्फे ऐतिहासिक दसरा चौकात आयोजित सभेत ते बोलत होते.श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व संभाजीराजे प्रमुख उपस्थित होते. पावणेपाच तास उशिरा सुरू झालेल्या सभेस मराठा बांधवांसह महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. जरांगे-पाटील यांनी गावा-गावांतील लोक रस्त्यावर उतरून स्वागत करत असल्याने सभेच्या ठिकाणी पोचण्यास उशीर झाल्याचे स्पष्ट करत दिलगिरी व्यक्त केली.जरांगे-पाटील म्हणाले, ‘‘मराठ्यांना डावलून पुढे जाणारी माझी औलाद नाही. भले पाचजण जरी रस्त्यावर आले तरी मी त्यांना भेटतो. अनेक षड्‌यंत्र मोडीत काढत आरक्षण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे काळजी करू नका. मराठा समाजाला १८०५ ते १९६७ पर्यंत आरक्षण होते. त्याचे पुरावे शोधले असून, गावागावांत पुरावे सापडायला लागले आहेत. मग ते सत्तर वर्षे कोणी लपवून ठेवले? आरक्षणासाठी ज्या समित्या नेमल्या, त्या समित्यांचे मराठ्यांकडे पुरावे नसल्याने त्यांना आरक्षण देता येणार नाही, असे म्हणणे होते. आता तर पुरावे सापडायला लागले आहेत. काही व्यक्तींचा सरकारवर इतका दबाव होता की, पुरावे सापडत नव्हते. तेच पुरावे आता कसे मिळतात, या प्रश्‍नाचे उत्तर मिळाल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही. पुरावे मिळाल्यावरच आरक्षण मिळाले असते, तर मराठा ही जगात प्रगत जात म्हणून पुढे आली असती.’’ सामान्य मराठ्यांनी आंदोलन हातात घेऊन एकजूट दाखविल्यानंतर पुराव्यांचा अहवाल बनविणे सुरू झाले आहे, असे स्पष्ट करत ते म्हणाले, ‘‘हैदराबाद संस्थानातील नोंदीचा अहवाल बनवून सरसकट आरक्षण द्यायचे, असे आमचे व सरकारचे ठरले होते. तो सरकारला सादर झाल्यानंतर एक भाऊ खूश, तर दुसरा नाराज असे चालणार नाही, अशी भूमिका सरकारसमोर मांडली. त्यामुळे त्या समितीला राज्याचा दर्जा देऊन कुणबीच्या नोंदींचा शोध सुरू झाला. ज्यामुळे आरक्षणाचे दान पदरात पडायला सुरुवात झाली आहे. ज्यांनी आरक्षणाची आशा सोडली होती, त्यांनी पुन्हा शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे.’’ भुजबळांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधत जरांगे – पाटील म्हणाले, ‘‘मधल्या काळात मी त्यांच्यावर बोलायचे बंद केले होते. त्यावर मी त्यांच्या एकट्याच्या मागे लागलोय, असे त्यांचे म्हणणे होते. दोन-चार दिवसांनी पुन्हा त्यांचे सुरू झाले. मी तऱ्हेवाईक असल्याने मोठा दणका देतो. सरकारने त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवावे. समाजात दंगली घडवून आणण्याचे काम ते करत आहेत. त्यांना मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रोखावे. आमचे बोर्ड फाडले जात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -